माझी माती, माझा देश अभियान :  शारदा महाविद्यालयात पंचप्रण शपथ 

माझी माती, माझा देश अभियान :  शारदा महाविद्यालयात पंचप्रण शपथ 

परभणी : शारदा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने “क्रांती दिन” साजरा करण्यात आला. या वेळी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित “माझी माती माझा देश” अभियानाच्या अंतर्गत ” पंचप्रण शपथ उपस्थितांना देण्यात आली.  कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.श्यामसुंदर वाघमारे, तर प्रमुख अतिथी म्हणून कविवर्य ॲड.शंकर कदम उपस्थित होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.संतोष नाकाडे व सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा.डॉ.ज्ञानोबा मुंढे यांचीही उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्याना क्रांती दिनाचे महत्त्व व भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास सविस्तर सांगण्यात आला. त्यांनतर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.सचिन खडके यांनी सर्वांना “पंचप्रण”शपथ दिली. कविवर्य पद्मश्री ना. धो. महानोर व ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थी,प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.


Amrit Bharat Station Scheme : सेलू स्थानकाच्या २३ कोटींच्या पुनर्विकासकामांचा रविवारी शुभारंभ; पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!