Dr.S.R.Rangnathan : आत्मशोधासाठी वाचन समृद्ध व्हावे : डॉ.विश्वाधार देशमुख; नूतन महाविद्यालयात डॉ.रंगनाथन यांना अभिवादन

Dr.S.R.Rangnathan : आत्मशोधासाठी वाचन समृद्ध व्हावे : डॉ.विश्वाधार देशमुख; नूतन महाविद्यालयात डॉ.रंगनाथन यांना अभिवादन

सेलू : सेलू (जि.परभणी) येथील नूतन महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ.एस. आर.रंगनाथन जयंती निमित्त कार्यक्रम झाला. या वेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉ.विश्वाधार देशमुख म्हणाले,” आत्मशोधासाठी प्रत्येकाने वाचन समृद्ध करण्याची गरज आहे.”
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.उत्तम राठोड होते. डॉ.विश्वाधार देशमुख म्हणाले, की माणसाच्या उत्क्रांतीतल्या महत्वाच्या शोधापैकी भाषेचा शोध हा महत्त्वाचा असून त्यातूनच आपण संवाद साधायला बोलायला, लिहायला,वाचायला शिकलो. ग्रंथालयातील पुस्तके म्हणजे गोठलेला काळ असतो. आपण जेव्हा पुस्तकाकडे जातो. वाचतो, तेव्हा तो काळ आपल्यापुढे उलगडतो. आपण कोण आहोत ? याचा शोध वाचनातून घेता येतो. वाचन हा आत्मशोधाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. सोयीसुविधांसोबत ग्रंथालयात प्रसन्नता राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रास्ताविकात ग्रंथपाल डॉ.मोहन काटकर यांनी, ग्रंथालयात राबविण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल तसेच; वाचनाची गोडी लागावी, म्हणून घेतल्या जाणाऱ्या उत्कृष्ट वाचक पुरस्कार स्पर्धेविषयी माहिती दिली. ही स्पर्धा फक्त किती पुस्तकं वाचले यापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे किती आकलन केले. समजून घेतले यावर आहे, असे काटकर यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.उत्तम राठोड म्हणाले की, नूतन महाविद्यालयाचे ग्रंथालय हे समृद्ध आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजेत. ग्रंथालयाचा व विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा. सूत्रसंचालन डॉ.राजाराम झोडगे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.गुलाब शेख यांनी दिला, तर डॉ.रमेश बैनवाड यांनी आभार मानले.


Be Positive : सकारात्मक चिंतनासाठी राजयोग ध्यानाभ्यासाची गरज : बी.के.सीमा दीदी

Amrit Bharat Station Scheme : सेलू स्थानकाच्या २३ कोटींच्या पुनर्विकासकामांचा रविवारी शुभारंभ; पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!