स्वातंत्र्य दिन : घराघरावर तिरंगा डौलाने फडकवावा : सीईओ विनय मून
परभणी, दि.१२ : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात यावर्षी ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील दि. १३, १४ आणि १५ ऑगस्ट या दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, सर्व घरावर तिरंगा झेंडा फडकवून सर्वांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय मून यांनी केले आहे.
जिल्हाभरात ग्रामीण भागात जवळपास २,६३,००० निवासी इमारती असून, या करिता बऱ्याच नागरिकांकडे मागील वर्षी वाटप केलेले ध्वज उपलब्ध असल्याचा अहवाल ग्रामपंचायतीकडून प्राप्त झाला आहे. तसेच ग्रामपंचायतच्या मागणी नुसार अतिरिक्त ध्वज वेगवेगळ्या ग्रामपंचायतीना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. तसेच विविध पोस्ट ऑफिसमार्फत नागरिकांना ध्वज खरेदी देखील करता येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोंसीकर यांनी दिली आहे. १३, १४ आणि १५ ऑगस्ट या दिवशी ध्वज फडकवताना सर्वांनी ध्वजसंहितेचे पालन करावे, असेही आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिन : कागदी व प्लास्टिक राष्ट्रध्वज वापरु नका : जिल्हाधिकारी