नवीन शैक्षणिक धोरण : विद्यार्थ्यांनो, हवा तो विषय निवडा : डॉ.एम.के.पाटील
सेलूतील नूतन महाविद्यालयात व्याख्यान
सेलू : येथील नूतन महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण या विषयावरील कार्यशाळेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.के.पाटील यांचे व्याख्यान झाले.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या संबंधाने बोलताना 16 एप्रिल 2023 रोजी पारित केलेला शासननिर्णय व त्यातून येणारे नवे शैक्षणिक धोरण 2024-25 पासून लागू करण्यात येईल आणि यात विद्यार्थांना आपल्याला हव्या असलेल्या आवड असलेल्या विषयात शिक्षण घेता येईल. वेगवेगळ्या विद्यापीठातून तज्ज्ञ अभ्यासकांचा अभ्यास गट मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेला आहे, असे सांगून शिक्षणाची भारतीय परंपराही सांगितली. तक्षशिला नालंदा या महत्त्वपूर्ण भारतीय विद्यापीठांपासून आजपर्यंतच्या शैक्षणिक धोरणाचा आढावा घेत, नव्या शैक्षणिक धोरणाबद्दलची आश्वासकता व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ.महेंद्र शिंदे यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ.उत्तम राठोड यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचे स्वागत करत त्यातील घटकांची चर्चा केली.
सूत्रसंचालन प्रा.विजय पटारे यांनी केले, तर आभार डॉ. मोहन काटकर यांनी मानले. या वेळी नूतन महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिन : चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद; डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाचा उपक्रम