स्वातंत्र्य दिन‌ : चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद; डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाचा उपक्रम

स्वातंत्र्य दिन‌ : चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद; डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाचा उपक्रम

स्वातंत्र्य दिन‌ : चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद; डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाचा उपक्रम

स्वातंत्र्य दिनानिमित्त रंगभरण , चित्रकला स्पर्धा

सेलू : स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील डॉ.संजय रोडगे डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाच्या वतीने सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजिण्यात आली. स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.

अकराशे हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रंगभरण स्पर्धा इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांकरिता तसेच; चित्रकला स्पर्धा चौथी ते पाचवी व सहावी ते आठवी या दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेत रवळगाव, गोहेगाव, आहेर बोरगाव, सिद्धनाथ बोरगाव, शिंदे टाकळी, माले टाकळी डिग्रस बरसाले, डासाळा, लाडनांद्रा, पावडे हादगाव, खूपसा, मोरेगाव, पिंपरी, शिराळा आदीं गावातील जिल्हा परिषद शाळांचे ११०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट रोजी गावनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासह पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. यशस्वीतेसाठी डॉ. संजय रोडगे मित्रमंडळाचे सदस्य व ज्ञानतीर्थ विद्यालयाचे चित्रकला सहशिक्षक मुसळे यांनी पुढाकार घेतला.


स्वातंत्र्य दिन : घराघरावर तिरंगा डौलाने फडकवावा : सीईओ विनय मून


https://sakashnews.com/?p=6840

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!