सेलूतील नूतन कन्या प्रशालेत ग्रंथ दिन उत्साहात 

सेलूतील नूतन कन्या प्रशालेत ग्रंथ दिन उत्साहात 

सेलूतील नूतन कन्या प्रशालेत ग्रंथ दिन उत्साहात 

सेलू : येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या स्व.सौ.दुर्गाताई द.कुलकर्णी स्मृति ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक शियाली रामामृत रंगनाथन यांचा जन्म दिवस ग्रंथदिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका संगीता खराबे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, सुहास देऊळगावकर, शंकर बोधनापोड, रंगनाथराव काष्टे, सेवानिवृत ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती. श्रीजला काष्टे या विद्यार्थिनीने रंगनाथन यांच्या कार्याविषयी माहिती दिली. संगीता खराबे यांनी वाचनाचे महत्व विषद केले. रोहिदास मोगल यांनी ग्रंथमित्र पुरस्काराविषयी माहिती दिली. ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदे यांनी डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!