स्वातंत्र्य दिन : श्रीराम प्रतिष्ठानमध्ये स्वातंत्र दिन उत्साहात; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

देशभक्तीपर गीते, नृत्यांचे सादरीकरण

सेलू, दि.१५ : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित ज्ञानतीर्थ विद्यालयात भारतीय स्वातंत्र दिनानिमित्य संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी समूह नृत्य स्पर्धा व वैयक्तिक गीत गायन स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, मुख्याध्यापिका शालिनी शेळके, करणसिंग चव्हाण, दगडोबा माने उपस्थित होते.
स्वातंत्र दिनानिमित्य शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर आधारित नृत्याचा व वैयक्तिक देशभक्तीपर गीताचे सादरीकरण केले. समूह नृत्य स्पर्धा, मनोगत व वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत एकूण ७६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ओमकार लाटे याने जिल्हास्तरीय अक्षर आनंद पुस्तक वाचन दुसऱ्या फेरीत क्रमांक मिळविल्याबद्दल डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. सूत्रसंचलन दिगांबर टाके यांनी केले. राजश्री वानरे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मुक्तीसंग्रामपर्व म्हणजे सुवर्णपान : सतीश कुलकर्णी यांचे प्रतिपादन, सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम

स्वातंत्र्य दिन : श्रीराम प्रतिष्ठानमध्ये स्वातंत्र दिन उत्साहात; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!