सारे जहाँ से अच्छा : देशभक्तीपर गीतांनी चैतन्य फुलले; सेलूतील नूतन विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात
सेलू, दि.१५ : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयामध्ये स्वातंत्र्याच्या व हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवानिमित्त ध्वजारोहण सोहळा मंगळवारी, १५ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी गायीलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण चैतन्य फुलले.
मुख्याध्यापक नारायण सोळंके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, सदस्य अजीज खाँ पठाण, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी सुरेखा खिल्लारे, सतीश जाधव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक के.व्ही.वाघमारे, एन.एम.देशपांडे, अनिल कुलकर्णी, कलाशिक्षक दे.बा.मुर्तीकर, के.पी.राठोड, एन.एम.आतनूरकर यांच्यासह सेवा निवृत्त शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
सच्चिदानंद डाखोरे व संचाने सारे जहाँ से अच्छा, इन्साफ की, डगर पर ही देशभक्तीपर गीत गायीले. सामुदायिक राष्ट्रगीत व जय जय महाराष्ट्र माझा गीतांनी आसमंत दणाणून गेला. याप्रसंगी मुख्याध्यापक सोळंके यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गणेश माळवे यांनी केले. उपमुख्याध्यापक संतोष पाटील, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, काशीनाथ पल्लेवाड, सतीश नावाडे पालक शिक्षक संघाचे सदस्य आदींची उपस्थिती होती.