1043स्वातंत्र्य दिन : सेलूतील फिन किड्स चिमुकल्यांनी जिंकली मने; प्रोस्परस पब्लिक स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात
सेलू : ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित प्रोस्परस पब्लिक स्कूल व फिन किड्स येथे संस्थेचे प्रेरणास्थान डॉ.रामराव रोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानिमित्ताने फिन किड्सच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर समूहनृत्य; तसेच सामूहिक गीत गायनाने उपस्थितांची मने जिंकली.
मंगळवारी, १५ ऑगस्ट रोजी शाळेच्या क्रीडांगणावर हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे ,सदस्य डॉ.अपूर्वा पारवे, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर आधारित नृत्याचा व सामूहिक देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. १७ विद्यार्थ्यांनी इंग्रजीतूध देशाबद्दलचे स्वतःमत व्यक्त केले. यामध्ये फिनकिड्स विद्यार्थ्यांचे समूह नृत्य लक्षवेधी ठरले. सूत्रसंचालन वैष्णवी मगर व अक्षरा चव्हाण या विद्यार्थींनी केले. दीपा सावंत यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.