स्वातंत्र्य दिन : सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानमध्ये माजी सैनिकांचा सन्मान; बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

स्वातंत्र्य दिन : सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानमध्ये माजी सैनिकांचा सन्मान; बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एल.के.आर.रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त सेलू शहरातील माजी सैनिकांचा सन्मान व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी माजी सैनिक कॅप्टन जे.पी.शर्मा काकडे रमेश काकडे, रघुनाथ देशमुख, लक्ष्मण शेरे, शिवाजी बेंद्रे, विठ्ठलसिंग ठाकूर रघुवंशी, सुरेश रोडगे, लक्ष्मण कनकुटे, गंगाधर राऊत, एस.के.महाजन, शिवाजी झोल, विठ्ठल शिंदे, बजरंग कदम, विजय देशमुख, माणिक मस्के, सदाशिव पौळ आदींसह मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. बालकलाकारांनी स्वातंत्र्यसंग्रामातील जालियानवाला बाग हत्याकांडवर नाटिका सादर केली. विविध देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. देश मेरे, वंदे मातरम, देश रंगीला, ये मेरे वतन के लोगो आदी गीतांवर विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. बारावीतील विद्यार्थिनींनी योगावर आधारित प्रात्यक्षिके नृत्याद्वारे सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माजी सैनिकांचा सत्कार सन्मान डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात डॉ.संजय रोडगे यांनी म्हणाले की, श्रीराम प्रतिष्ठानने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई अभ्यासक्रमाची मान्यताप्राप्त व जागतिक दर्जाची शाळा उभारली आहे. अत्यल्प शालेय शुल्कामध्ये शिक्षणाद्वारे ज्ञानदानाचे काम होत आहे. ही खूप कौतुकाची बाब आहे.
डॉ.संजय रोडगे म्हणाले की, लोकांना वाटते मी खूप काही केले आहे. पण, मी एवढ्यावर समाधानी नाही. मला माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप काही करायचे आहे. ते अविरत करण्याचा माझा प्रयत्न आहे. आजघडीला श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत सर्वच क्षेत्रात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, डॉक्टर इंजिनियर सोबत विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या संरक्षण क्षेत्रात करिअर करावे व देशसेवा करावी यासाठीही आमचा प्रयत्न चालू आहे. याचे उत्तम उदाहरण आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी संगमेश मलवडे एनडीएमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपवून देश सेवेसाठी रुजू होईल. ही सेलूवासियांसाठी खूप अभिमानाची बाब आहे. कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्रगती क्षीरसागर, कार्तिक रत्नाला शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रगती क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन शेख अजिज यांनी केले. कार्तिक रत्नाला यांनी आभार मानले.

डॉ.संजय रोडगे म्हणाले की, लोकांना वाटते मी खूप काही केले आहे. पण, मी एवढ्यावर समाधानी नाही. मला माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप काही करायचे आहे. ते अविरत करण्याचा माझा प्रयत्न आहे. आजघडीला श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत सर्वच क्षेत्रात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, डॉक्टर इंजिनियर सोबत विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या संरक्षण क्षेत्रात करिअर करावे व देशसेवा करावी यासाठीही आमचा प्रयत्न चालू आहे. याचे उत्तम उदाहरण आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी संगमेश मलवडे एनडीएमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपवून देश सेवेसाठी रुजू होईल. ही सेलूवासियांसाठी खूप अभिमानाची बाब आहे.

स्वातंत्र्य दिन : सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानमध्ये माजी सैनिकांचा सन्मान; बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद


स्वातंत्र्य दिन : सेलूतील फिन किड्स चिमुकल्यांनी जिंकली मने; प्रोस्परस पब्लिक स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

सारे जहाँ से अच्छा : देशभक्तीपर गीतांनी चैतन्य फुलले; सेलूतील नूतन विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!