Idealistic : कान्हेकरांच्या दातृत्वाने ‘शारदा’ ला नवी उभारी

Idealistic : कान्हेकरांच्या दातृत्वाने ‘शारदा’ ला नवी उभारी

शाळा इमारत बांधकामासाठी ५१ लाखांची मदत

सेलू जि.परभणी : सेलू (जि.परभणी) शहरातील शारदा विद्यालयातील शिक्षणाला प्रल्हादराव कान्हेकर आणि कुटुंबियांच्या ५१ लाख रुपयांच्या दातृत्वाने नवी उभारी मिळणार आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कान्हेकरांनी ११ लाख रुपयांचा पहिला धनादेशही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केला.
कान्हेकर यांच्या आई राधाबाई व वडील किशनराव कान्हेकर यांचे एकाच दिवशी (पाच जुलै २०२३)निधन झाले. या धक्क्यातून सावरत असतानाच आईवडीलांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून, नंदकुमार, प्रल्हादराव, राजेंद्र कान्हेकर व कुटुंबियांनी शाळेसाठी देणगीचा संकल्प केला. यासाठी त्यांनी श्री संत गोविंद बाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शारदा विद्यालयाची निवड केली. या शाळेत बहुतांश शेतकरी, शेतमजूर, कामगार, वंचित, गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. ३८ वर्षांपासून जुजबी इमारतीत दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे. शाळेसाठी स्वतःची जागा घेतल्यानंतर संस्थाचालक आणि शिक्षण प्रेमी नागरिकांच्या सहकार्याने वर्षभरापूर्वी निपाणी टाकळी रस्त्यालगत इमारत बांधकामही संस्थेने हाती घेतले.

या पार्श्वभूमीवर कान्हेकर कुटुंबियांनीदेखील शाळेच्या सातही खोल्या़साठी ५१ लाख रुपये देणगीचा संकल्प केला. ध्वजारोहणप्रसंगी प्रल्हादराव कान्हेकर यांनी ११ लाख रुपयांचा पहिला धनादेश संस्थेचे अध्यक्ष मुंजाभाऊ भिसे, सचिव चंद्रप्रकाश सांगतानी यांच्याकडे सुपुर्द केला. या वेळी सहसचिव सुनील डख, संचालक रामनाना पाटील, प्रफुल्ल बिनायके, नंदकिशोर बहिवाल, चंद्रशेखर नावाडे, अनुप कान्हेकर, श्रीराम कान्हेकर, मुख्याध्यापक डी.डी.शिंदे, बी.आर.साखरे, शिवाजी वाघमारे यांची उपस्थिती होती. दरम्यान, कान्हेकर कुटुंबियांच्या दातृत्वभावामुळे शाळेच्या नामविस्तार ”कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालय, सेलू” असा करण्याचा ठराव संस्थेच्या सर्वसाधारणसभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर नावाडे यांनी या वेळी दिली. याप्रसंगी प्रल्हादराव कान्हेकर, अनुप कान्हेकर,श्रीराम कान्हेकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले.भरत रोडगे, रोहिदास चव्हाण, संतोष चारठाणकर, अभिमान पाईकराव, विजय हिरे, संदीप जुमडे, उषा कामठे, सीमा उंडे, बालासाहेब टरपले, नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे, भारती मुळे आदींसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

दुर्लक्षित शाळांचा प्राधान्याने सर्वांगीण विकास व्हावा, सामान्य कुटुंबातील मुलांनाही शैक्षणिक व भौतिक सोयीसुविधांनी सुसज्ज शाळांतून अधिक दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी. या उद्देशाने शारदा विद्यालयाला मदतीचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. संस्थाचालकांनीही नामविस्तारातून आईवडिलांच्या स्मृती चिरंतन केल्या. याबद्दल कृतज्ञ आहोत. – प्रल्हादराव कान्हेकर, सेलू जि.परभणी


संभाजी ब्रिगेड : छगन शेरे यांचा कार्यगौरव

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!