चार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांची उपस्थिती
जिंतूर : शहरातील रस्त्याची झालेली दुर्दशा लक्षात घेता, नगरविकास विभाग मंत्रालय योजनेअंतर्गत शहरातील विविध प्रभागात रस्त्यांचे सिमेंट क्रॉंकिटीकरण, मजबुतीकरण; तसेच नाली बांधकाम आदी विविध ४ कोटी ३० लाख रुपयांची विकास काम हाती घेण्यात आली आहेत. या विकासकामांचे भूमिपूजन आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, डॉ.पंडित दराडे, सुनील भोम्बे, विकी बोर्डीकर, गोपाळ रोकडे, प्रदीप चौधरी, दत्ता कटारे, रहमानभाई, मुखीद पठाण, हकीम पठाण, ॲड.विनोद राठोड, विलास भंडारे, गणेश कुरे, किशोर जाधव, अशोक बुधवंत, भगवान वटाणे, गजानन घुगे, संतोष देशमुख, संतोष राठोड, गणेश दराडे, संजय घुले, रवी रणबावळे, बंटी जाधव, आवेश पठाण, गुजर आदींसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग जिंतूर येथील शाखा अभियंता दाभाडे, कृष्णा राऊत, नागरिक उपस्थित होते.
विकास कामे : ग्रीन पार्क परभणी रस्ता कमान ते महाजन यांचे घर, प्रभाग क्रमांक ११ : गजानन शेवाळे यांचे घर एअरटेल टॉवर, रमेश चोरडिया ते तूपसुंदर यांचे घर संभाजीनगर पर्यंत, प्रभाग क्रमांक १२ : गंगानगर होंडा शोरूम ते गोपी मुळे, खरात यांचे घर, प्रभाग क्रमांक १० : रोकडे किराणा ते अंबादास घुले यांचे घर, बलसा रोड इम्तियाज कच्ची यांचे घर ते संतोष सिंग राठोड यांचे घर, प्रभाग क्रमांक ९ : सत्तार किराणा ते ओमकार कटारे यांचे घर, सटवाई मंदिर ते कंधारकर यांचे घर, जवाहर पांदण रस्ता ते पावरकर गिरणी डावरे यांचे घर, चवंडके किराणा ते इटोलीकर जैन मंदिर रस्ता, प्रभाग क्रमांक ४ : बन्सी रोकडे यांचे घर ते श्रीराम सोनी यांचे घर, राजू यावलकर यांचे घर ते वसंत शिंदे यांचे घर, प्रभाग क्रमांक ५ : सुभाष कडे, भिकूलाल गाडीया यांचे घर, प्रभाग क्रमांक ४ : अखिल किराणा ते धरमचंद अच्छा यांचे घर, बलसा रोड ते कबीर भाई यांचे घर.
Idealistic : कान्हेकरांच्या दातृत्वाने ‘शारदा’ ला नवी उभारी; शाळा इमारत बांधकामासाठी ५१ लाखांची मदत