Table tennis : राज्य नामांकन टेबल टेनिस स्पर्धेत आद्या बाहेतीला उपविजेेपद

Table tennis : राज्य नामांकन टेबल टेनिस स्पर्धेत आद्या बाहेतीला उपविजेेपद

परभणी : १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यात आद्या महेश बाहेतीने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उपविजेेपद पटकावले.

उप-उपांत्य पूर्व सामन्यात नाशिकच्या केईशा पुरकरवर ३-२ असा विजय मिळवत उप-उपांत्य फेरी गाठली. उपांत्य पूर्व सामन्यात नागपूरच्या पूर्वी रेणूवर ३-१ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. चुरशीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात मुंबई उपनगरच्या व्दितीय मानांकित वेदिका जैस्वालवर ३-२ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरी खेळत तीने उपविजेतेपद पटकावले; तसेच ओवी महेश बाहेती हिने उपउपांत्य पूर्व फेरी खेळली.

सहभागी खेळाडुमध्ये शरयू माधव टेकाळे (स्कॉटिश अकॅडमी), समृध्दी नांदापुरकर, देवाशिष राजेश कदम, शिवनंदन मनोहर पुरी, रुद्र माधव पाटील, योगेश राम घुले (बालविद्या मंदिर), आरूष गुलाब ताठे, शिवम अनिल डख (नूतन विद्यालय, सेलू) अद्वैत श्रीकांत मणियार (पोदार इंटरनॅशनल ) या खेळाडूंचा समावेश आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व भारतीय खेळ प्राधिकरण (साई) यांच्यामार्फत चालणाऱ्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र व, परभणी येथे प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूं प्रशिक्षण घेतात.

या खेळाडूंना विजय अवचार, अजिंक्य घन, तुषार जाधव, सुरज भुजबळ, रोहित जोशी, विशाल मेहता, शिवप्रसाद कदम, गौस खान पठाण, चेतन सुरवसे, विक्रम हत्तेकर, निखील झुटे यांनी स्पर्धा सरावासाठी मार्गदर्शन केले.ज्ञया उज्ज्वल यशाबद्दल जिल्हा क्रीडाधिकारी जयकुमार टेंभरे, सिटी क्लब सचिव डॉ.विवेक नावंदर, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडाधिकारी शैलेंद्रसिंग गौतम, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष समशेर वरपुडकर, कार्याध्यक्ष डॉ.माधव शेजुळ, उपाध्यक्ष संतोष सावंत, सचिव गणेश माळवे, डी.पी.पंडीत, खेळाडू, पालक यांनी अभिनंदन केले आहे.


Idealistic : कान्हेकरांच्या दातृत्वाने ‘शारदा’ ला नवी उभारी; शाळा इमारत बांधकामासाठी ५१ लाखांची मदत

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!