यशोदामैय्या मातृउत्सवात ४८ मातांचा सन्मान
सेलूतील राजस्थानी महिला मंडळांचा सुवर्ण महोत्सवानिमित्त उपक्रम
सेलू (जि.परभणी) : येथील राजस्थानी महिला मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यशोदामैय्या मातृउत्सव शनिवारी, १९ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी वयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त ४८ मातांचे वैदिक मंत्रोच्चारात पूजन करून सन्मान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पा तोष्णीवाल होत्या. कौशल्या ग्लोबल स्कूलचे संस्थापक रमेश परताणी (हैदराबाद), सरोज गट्टाणी, मिरजचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सावित्रीबाई बिहाणी, अध्यक्ष कांचन बाहेती, सचिव पुष्पा तोष्णीवाल आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी कमलाबाई भुतडा, कमलाबाई बाहेती, सावित्रीबाई बिहाणी, सरजूबाई व्यास, शांताबाई काबरा आदींसह ४८ मातांचा शाल, श्रीफळ, मोतीहार व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. वंदना मंत्री, नीता बलदवा, विजया बांगड, ममता काबरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रमेश परताणी यांनी कौशल्या जिनियस किड्स प्रोग्रामची सविस्तर माहिती दिली. शून्य ते पंधरा वयोगटातील मुलांचा बौद्धिक व अध्यात्मिक विकासासाठीच्या आईवडीलांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे; तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून संस्कार रुजविण्याची गरज आहे. मुलांमधील प्रतिभा व आवड ओळखून करिअरला दिशा देण्याचा प्रयत्न पालकांनी केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. सरोज गट्टाणी यांनी जीवनात मातेचे महत्व स्पष्ट केले, तर प्रणिल गिल्डा यांनी बुद्धी व संस्काराने सशक्त पिढी घडविण्यासाठी पालकांची जबाबदारी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
प्रारंभी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले. अनिता झंवर यांनी स्वागत गीत गायीले. प्रास्ताविक कांचन बाहेती यांनी केले. सूत्रसंचालन लता गिल्डा, शीतल बिहाणी यांनी केले. पुष्पा तोष्णीवाल यांनी आभार मानले.उत्सवामध्ये संतोष गरूड यांनी चारधाम देखावा, तर वेदांत बिहाणी, केशव मंत्री या चिमुकल्यांनी सादर केलेल्या सजीव देखाव्याने लक्ष वेधले. ‘प्रभुलीला प्रेमसागर’ या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली. नंदकिशोर तोष्णीवाल, ॲड.रोहित पाटील, सीताराम मंत्री, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती आदींसह मान्यवरांची; तसेच माहेश्वरी समाजातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी शोभा परताणी, उमा बाहेती, नीता मालाणी, किरण राठी, अनुराधा मंत्री, रेखा लोया, उज्ज्वला मालाणी, भाग्यश्री परताणी, रूपाली जाजू, अर्चना काबरा, संगीता काबरा प्रतिमा परताणी, ज्योती दायमा, शैलजा भुतडा, शारदा बाहेती, ममता मंत्री, रंजना बाहेती, शिल्पा शर्मा, सविता कासट, अश्विनी बिहाणी, वर्षा मुंदडा, प्रमिला भंडारी, ललिता भुतडा, प्रीती साबू, शंकुतला जाजु आदींसह राजस्थानी महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
सन्मानार्थी माता : कमलाबाई मोतीलालजी भुतडा, कमलाबाई राधाकिशनजी बाहेती, सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी, सरजुबाई रामदयालजी व्यास, शांताबाई रामप्रसादजी काबरा, गंगाबाई पन्नालालजी काबरा, जमुनाबाई कंचनलालजी भुतडा, ताराबाई जयनारायणजी लोया, लिलावती सीतारामजी काबरा, बसंताबाई हरिप्रसादजी परताणी, मालतीबाई श्रीरामजी परताणी, सावित्रीबाई श्रीरामजी भुतडा, कमलाबाई शामसुंदरजी काबरा, मनोरमाबाई राधाकिशनजी भाला, सरजूबाई भगवानदासजी कासट,नर्मदाबाई रामचंद्रजी तोष्णीवाल, गीताजीजी दायमा, शांताबाई रामप्रसादजी दायमा, शांताबाई सोनी, कुसुमावती रामकिशनजी जाजू, गंगाबाई झंवर, काशीबाई शिवप्रसादजी काबरा, कमलाबाई श्रीनिवासजी करवा, चंद्रकलाबाई श्रीकिशनजी सोमाणी, संतोषदेवी जगदिशप्रसादजी गुप्ता, लक्ष्मीबाई ग्यानगोपालजी काबरा, फुलकंवर सत्यनारायणजी लोया, शांताबाई लालचंदजी काबरा, कांताबाई राठी, सदाकंवरबाई सीतारामजी राठी, पुष्पाजीजी सुभाषचंदजी काला, कौसल्याबाई लोया, पुष्पादेवी श्रीनिवासजी लोया, पुष्पादेवी टेकचंदजी मंत्री, रूक्मिनीबाई दोडीया, द्वारकाबाई श्रीकिशनजी जाजू, केशरबाई सोमाणी (मंठा), मुन्नीबाई अग्रवाल, शकुंतलाबाई गौड, रामकन्या रामस्वरूपजी जाजू, सुलोचनाबाई रामकिशनजी तोष्णीवाल, बिदामाबाई शर्मा, कचंनबाई पदमकुमारजी बिनायके, शांताबाई श्रीनिवासजी चौबी, कमलाबाई पारीख, कमलाबाई गंगाबिशनजी बाहेती, रूक्मिणीबाई बालाप्रसादजी मुंदडा, सरजुदेवी भिकुलालजी सोनी
शून्य ते पंधरा वयोगटातील मुलांचा बौद्धिक व अध्यात्मिक विकासासाठीच्या आईवडीलांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे; तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून संस्कार रुजविण्याची गरज आहे. मुलांमधील प्रतिभा व आवड ओळखून करिअरला दिशा देण्याचा प्रयत्न पालकांनी केला पाहिजे, असे मत रमेश परताणी यांनी या वेळी व्यक्त केले. सरोज गट्टाणी यांनी जीवनात मातेचे महत्व स्पष्ट केले, तर प्रणिल गिल्डा यांनी बुद्धी व संस्काराने सशक्त पिढी घडविण्यासाठी पालकांची जबाबदारी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
वृत्तसंकलन : बाबासाहेब हेलसकर, सेलू
छायाचित्र सौजन्य : सदाशिव महाजन, सेलू
Idealistic : कान्हेकरांच्या दातृत्वाने ‘शारदा’ ला नवी उभारी; शाळा इमारत बांधकामासाठी ५१ लाखांची मदत