Competitive Exams : डीवायएसपी प्रणिल गिल्डा यांचे सेलूतील विद्यार्थ्यांना आज मार्गदर्शन
स्व.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम
सेलू जि.परभणी : येथील स्व.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने सेलू व परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने सेलूचे भूमिपुत्र तथा मिरजचे (जि.सांगली) उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांचे मार्गदर्शन रविवारी, २० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे.
साई नाट्य मंदिरात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आहे. या प्रसंगी माजी आमदार विजयराव भांबळे, उद्योजक रामप्रसाद घोडके, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्याधिकारी राहुल देशपांडे (मुंबई), गटकळ ॲकडमीचे संचालक रामेश्वर गटकळ, गुरुकृपा कोचिंग क्लासेसचे संचालक मनीष बोरगावकर, आर.एस.फांऊडेशनचे राहूल सूर्यवंशी, युनिकॉम कम्प्युटर्सचे उदय निर्वळ आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा संयोजक अशोक काकडे यांनी केले आहे.