Dysp Pranil Gilda : ध्येयपूर्तीसाठी प्रबळ आत्मविश्वासाची गरज : डीवायएसपी प्रणिल गिल्डा

Dysp Pranil Gilda : ध्येयपूर्तीसाठी प्रबळ आत्मविश्वासाची गरज : डीवायएसपी प्रणिल गिल्डा

सेलूतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद, स्व.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम

Dysp Pranil Gilda : ध्येयपूर्तीसाठी प्रबळ आत्मविश्वासाची गरज : डीवायएसपी प्रणिल गिल्डा

Authored By Babasaheb Helaskar

सेलू जि.परभणी : कोणत्याही क्षेत्रात धेय्यपूर्ती गाठायची असेल, तर वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, संयम, प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास जागविण्याची गरज महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सेलूचे भूमीपूत्र तथा मिरजचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी रविवारी, २० ऑगस्ट रोजी केले.
सेलू जि.परभणी येथील स्व.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून गिल्डा बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव भांबळे होते. या वेळी उद्योजक रामप्रसाद घोडके, मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्याधिकारी राहुल देशपांडे, संयोजक अशोक काकडे, रामेश्वर गटकळ, मनीष बोरगावकर, राहूल सूर्यवंशी, उदय निर्वळ, सुजित मालाणी, गोपाळ काबरा, गोविंद कासट आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धा परीक्षेविषयी गिल्डा यांनी बारीकसारीक तपशीलाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की अवघड गोष्टींची आवड आणि आत्मविश्वास असणाऱ्या प्रत्येकाने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. यासोबतच वय, कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती आणि जबाबदारीची जाणीव, संयम आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. अपयशाने खचू न जाता, पर्यायी संधीच्या स्वीकाराची तयारी ठेवणे गरजेचे आहे. मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा उपयुक्ततेनुसार वापर करा. प्रलोभनाला बळी पडू नका. सोशल मीडियावरील टाईमपास बंद करा, असे आवाहन करून सामाजिक भान, बांधिलकी, संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव महत्वाची आहे, असेही गिल्डा यांनी स्पष्ट केले.
या वेळी माजी आमदार भांबळे यांनी, तरुणांनी व्यसनाधीनता, नैराश्यापासून स्वतःला दूर ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून पालकांनीही मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये, असे आवाहन केले. राहूल देशपांडे म्हणाले, की सेलू शहराने शैक्षणिक गुणवत्ता आणि विधायक संस्कारांची जपवणूक केली आहे. यामध्ये विविध शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे नमूद करून अपयशाला घाबरू नका. सातत्यपूर्ण संघर्षाची तयारी ठेवा. या वेळी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रल्हादराव कान्हेकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अशोक काकडे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले. अशोक उफाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रणिल गिल्डा म्हणाले, की अवघड गोष्टींची आवड आणि आत्मविश्वास असणाऱ्या प्रत्येकाने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. यासोबतच वय, कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती आणि जबाबदारीची जाणीव, संयम आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. अपयशाने खचू न जाता, पर्यायी संधीच्या स्वीकाराची तयारी ठेवणे गरजेचे आहे. मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा उपयुक्ततेनुसार वापर करा. प्रलोभनाला बळी पडू नका. सोशल मीडियावरील टाईमपास बंद करा, असे आवाहन करून सामाजिक भान, बांधिलकी, संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव महत्वाची आहे, असेही गिल्डा यांनी या वेळी स्पष्ट केले.

Dysp Pranil Gilda : ध्येयपूर्तीसाठी प्रबळ आत्मविश्वासाची गरज : डीवायएसपी प्रणिल गिल्डा


छायाचित्र सौजन्य : शंभु काकडे, सेलू


Competitive Exams : यशासाठी समस्यांचा बाऊ करू नका : प्रणिल गिल्डा; मानवतच्या सानेगुरुजी वाचनालयात कार्यक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!