Competitive Exams : यशासाठी समस्यांचा बाऊ करू नका : प्रणिल गिल्डा; मानवतच्या सानेगुरुजी वाचनालयात कार्यक्रम

Competitive Exams : यशासाठी समस्यांचा बाऊ करू नका : प्रणिल गिल्डा; मानवतच्या सानेगुरुजी वाचनालयात कार्यक्रम

मानवत : प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात. ज्यांना यशस्वी व्हायचे आहे. त्यांनी समस्यांचा बाऊ न करता आत्मविश्वासाने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन मिरजचे पोलिस उपअधिक्षक प्रणिल गिल्डा यांनी रविवारी, २० ऑगस्ट रोजी केले.
मानवत (जि.परभणी) येथील साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने रविवारी स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन आयोजित केले होते. त्यावेळी प्रणिल गिल्डा बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ.अशोक चिंदूरवार होते. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष संजय लड्डा, ॲड.रोहित पाटील यांची उपस्थिती होती.
पुऐ बोलतांना गिल्डा यांनी सांगितले की, कुठल्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, सराव आणि सातत्य आवश्यक असते. विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. आत्मविश्वासाचा अभाव, साधनांची कमतरता व कौटुंबिक पार्श्वभूमी या प्रकारच्या समस्या अडथळा ठरु शकतात. मात्र, यशस्वी व्हायचे असेल तर या समस्यांचा जास्त विचार करून त्यांना मोठे करू नये. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय कठीण परिस्थितीत अभ्यास करून यश मिळवले. ज्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यात सर्वोत्तम कामगिरी करावी. प्रास्ताविक प्राध्यापक मोहन बारहाते यांनी केले. सूत्रसंचालन विलास मितकरी यांनी, तर प्रसाद जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे सचिव रेणकोजी दहे,अशोक देशमाने, शैलेश काबरा, सुभाष बंडे, कहेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कुठल्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, सराव आणि सातत्य आवश्यक असते. विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. आत्मविश्वासाचा अभाव, साधनांची कमतरता व कौटुंबिक पार्श्वभूमी या प्रकारच्या समस्या अडथळा ठरु शकतात. मात्र, यशस्वी व्हायचे असेल तर या समस्यांचा जास्त विचार करून त्यांना मोठे करू नये. – प्रणिल गिल्डा, पोलिस उपअधीक्षक, मिरज (जि.सांगली)


वृत्तसंकलन : श्रीपाद जोशी, मानवत


Competitive Exams : डीवायएसपी प्रणिल गिल्डा यांचे सेलूतील विद्यार्थ्यांना आज मार्गदर्शन

अभंगवाणी : संस्कार भारतीच्या वतीने सेलूत आज कार्यक्रम

यशोदामैय्या मातृउत्सवात ४८ मातांचा सन्मान; सेलूतील राजस्थानी महिला मंडळांचा सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!