Nagpanchami Mahotsav : सेलूतील नागपंचमी महोत्सवाला महिलांचा मोठा प्रतिसाद
पारंपरिक स्पर्धांसह झिम्मा फुगड्या रंगल्या, गीत संगीताच्या बहारदार कार्यक्रम
सेलू जि.परभणी : येथील विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने सोमवारी, २१ ऑगस्टरोजी आयोजित नागपंचमी महोत्सव उत्साहात साजरा झाला. महोत्सवाला महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला.मानाच्या पाच झोक्यांचा आणि विविध पारंपरिक स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी महिला व मुलींची झुंबड उडाली होती. महोत्सवामध्ये महिलांनी घातलेल्या झिम्मा फुगड्या चांगल्याच रंगल्या.
हुतात्मा स्मारक परिसरात विजया बोराडे, उर्मिला बोराडे व नयन बोराडे, साईराज बोराडे यांनी नागदेवता पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन केले. या वेळी हुतात्म्यांच्या शिलाफलकाला व स्मृतिस्तंभाला अभिवादन करण्यात आले. महोत्सवाच्या निमित्ताने संगीत खुर्ची, उखाणे, दोरीवरच्या उड्या, प्रश्नमंजुषा, फुगडी आदी पारंपारीक स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. नरेंद्र राठोड प्रस्तुत सप्तसुरांची मैफल रंगतदार ठरली. सकाळपासूनच हुतात्मा स्मारक परिसरात गर्दी फुलू लागली, दुपारनंतर झोक्यांचा आनंद घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली होती. सायंकाळीच्या सुमारास महोत्सवात महिलांची अक्षरक्ष: गर्दी उसळली होती. दरम्यान, महिला तसेच बच्चे कंपनींनींनी राहाट पाळण्याचा, झोक्यांचा आनंद घेतला. महोत्सवासाठी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली साईराज बोराडे व मित्रमंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
हुतात्मा स्मारक परिसरात विजया बोराडे, उर्मिला बोराडे व नयन बोराडे यांनी नागदेवता पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन केले. या वेळी हुतात्मांच्या शिलाफलकाला व स्मृतिस्तंभाला अभिवादन करण्यात आले. महोत्सवाच्या निमित्ताने संगीत खुर्ची, उखाणे, दोरीवरच्या उड्या, प्रश्नमंजुषा, फुगडी आदी पारंपारीक स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. नरेंद्र राठोड प्रस्तुत सप्तसुरांची मैफल रंगतदार ठरली.