Divyangjan : दिव्यांगांच्या मदतीसाठी सदैव कटिबद्ध : खासदार डॉ.फौजिया खान

Divyangjan : दिव्यांगांच्या मदतीसाठी सदैव कटिबद्ध : खासदार डॉ.फौजिया खान

जिंतूर येथे दिव्यांग तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद, माजी आमदार विजय भांबळे यांचे आयोजन

Divyangjan : दिव्यांगांच्या मदतीसाठी सदैव कटिबद्ध : खासदार डॉ.फौजिया खान

जिंतूर (जि.परभणी) : राज्यसभा खासदार संसदरत्न डॉ.फौजिया खान यांच्या पुढाकाराने माजी आमदार विजय भांबळे यांच्या संयोजनात व केंद्रसरकारचा अंगीकृत उपक्रम असलेल्या ALIMCO या संघटनेच्या संयुक्त सहकार्याने जिंतूर तालुक्यातील दिव्यांगासाठी अवयव दान करण्याच्या हेतूने रविवारी (२० ऑगस्ट ) जिंतूर येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.

विलासराव देशमुख उर्दू हायस्कूलजवळील अलमंड फंक्शन हॉलमध्ये शिबिर पार पडले. जिंतूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना सामाजिक दृष्टिकोनातून मदत व्हावी या हेतूने व दिव्यांगांना मोफत अवयव देण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ३०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. लाभार्थ्यांना कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कानाचे श्रवणयंत्र, अपंगांसाठी तीन चाकी सायकल, गाडा, चष्मा, काठी नोटपॅड इत्यादी साहित्य वाटप करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून संसदरत्न खासदार डॉ.फोजिया खान, माजी आमदार विजय भांबळे, अजय चौधरी, रामराव उबाळे, प्रसादराव बुधवंत, साबिया बेगम कपिल फारुकी, विश्वनाथ राठोड,  मुरलीधर मते, बाळासाहेब घुगे, अभिनय राउत, विठ्ठल घोगरे,  गणेशराव इलग, शरदराव मस्के,  मधुकर भवाळे, विजय खिस्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी बोलतांना खासदार फौजिया खान म्हणाल्या, की राज्यसभेचे खासदार असल्याने सामाजिक दृष्टिकोन जपत दिव्यांगांसाठी भरीव मदत व्हावी, या उद्देशाने कृत्रिम अवयव दान करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. दिव्यांगांच्या मदतीत कुठेही कमी पडणार नाही. सोबतच अनेक विकासकामे तसेच सामाजिक प्रश्न राज्यसभेत मांडून ते सोडविण्यावर भर दिला आहे. यापुढे देखील विविध सामाजिक व विकासाचे प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही खासदार खान यांनी या वेळी दिली.

माजी आमदार भांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना, जिंतूर तालुक्यात दिव्यांगांना विविध अवयव देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मोलाची मदत होईल. त्यांच्याकडे समाज वेगळ्या दृष्टीने पाहणार नाही. या विज्ञानवादी जगात कृत्रिम अवयवातून त्यांची गरज पूर्ण होईल. हेळसांड थांबेल. दिव्यांगांच्या मदतीसाठी कायम पुढाकार घेणार असल्याची ग्वाही माजी आमदार भांबळे यांनी या वेळी दिली.

यावेळी मुंजाभाऊ तळेकर, बाबाराव ठोंबरे, सुभाष घोलप, संतोष भवाळ, बाळासाहेब गायकवाड, प्रकाशराव शेवाळे, बाळासाहेब भांबळे, मनोहर डोईफोडे, श्यामराव मते, उस्मान पठाण, शेख इस्माईल, शोएब जानिमिया, शाहेद बेग मिर्झा, संजय निकाळजे, अशोक बहिरट, दलमीर खान पठाण, दत्ता काळे, आहेमद बागबान, सोहेल सर, उस्मान खान पठाण, यांच्यासह मकसूद पठाण, शौकत लाला, संजय काळे, अक्कू लाला, मनीषा केंद्रे, हरभरे ताई, आशा खिल्लारे, मनोज राऊत, हकीम लाला, शंकर जाधव, कुमार चौधरी, खयुम कादरी, सचिन बोबडे, शाहेद सिद्धिकी, शंकर माने, पंडित जाधव, सलीम भाई, सलीम काझी, विजय वाकळे, सचिन राऊत, श्याम सारंग, अंगद देशमुख, नायब तहसीलदार प्रशांत राखे, तालुका आरोग्य अधिकारी बोराळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच, उपसरपंच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार भांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना, जिंतूर तालुक्यात दिव्यांगांना विविध अवयव देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मोलाची मदत होईल. त्यांच्याकडे समाज वेगळ्या दृष्टीने पाहणार नाही. या विज्ञानवादी जगात कृत्रिम अवयवातून त्यांची गरज पूर्ण होईल. हेळसांड थांबेल. दिव्यांगांच्या मदतीसाठी कायम पुढाकार घेणार असल्याची ग्वाही माजी आमदार भांबळे यांनी या वेळी दिली. 


Nagpanchami Mahotsav : सेलूतील नागपंचमी महोत्सवाला महिलांचा मोठा प्रतिसाद

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!