Nagpanchami : विठोजी बिरोजींच्या दर्शनाला गर्दी
परभणी : सेलूतील तालुक्यातील डिग्रस जहांगीर येथील विठोजी बिरोजी मंदिरात सोमवारी नागपंचमी उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. दर्शनासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती.मंदिर परिसरातील माती (वावरी) घरात ठेवल्याने साप येत नाहीत, अशी अख्यायिका आहे; तसेच वजनी दगडी गोल गोटे उचलण्याची परंपरा या वर्षीही भाविकांनी जपली. छोटेखानी यात्रेमध्ये प्रसाद व खेळणीची दुकाने थाटण्यात आली होती. प्रसादसाठीच्या ४० हजारांवर नारळाची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. उत्सवासाठी स्वयंसेवक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
Nagpanchami Mahotsav : सेलूतील नागपंचमी महोत्सवाला महिलांचा मोठा प्रतिसाद