INAUGURATION : गुगळी धामणगावच्या निजामकालीन शाळेचे रुपडे पालटले

INAUGURATION : गुगळी धामणगावच्या निजामकालीन शाळेचे रुपडे पालटले

नवीन इमारतीचे लोकार्पण, खासदार संजय जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

INAUGURATION : गुगळी धामणगावच्या निजामकालीन शाळेचे रुपडे पालटले

सेलू (जि.परभणी) : तालुक्यातील गुगळी धामणगाव जिल्हा परिषद प्रशालेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण रविवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी खासदार संजय जाधव यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने गावातील निजामकालीन शाळेचे रुपडे पालटल्याचा आनंद दिसून आला.
याप्रसंगी माजी शिक्षण सभापती गंगाप्रसाद आणेराव, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे गटनेते रामनाना पाटील, रंगनाथ वाकणकर, सुरेश ढगे, दिपक बारहाते, रणजित गजमल, सरपंच अतुल डख, उपसरपंच शीतल काटकर, बापूराव डख, मंगल कथले, रमेश डख, आबासाहेब डख आदींसह ग्रामपंचायत सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेच्या नवीन इमारतीमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष, वाचनालय, विज्ञान प्रयोगशाळा, मल्टीस्कील व हेल्थकेअर लॅब, कार्यालय, शिक्षक कक्षासह एकूण बारा वर्ग खोल्या व मुलामुलींच्या स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था झाली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक जनार्दन कुलकर्णी यांनी दिली. कार्यक्रमासाठी जयंत नाईक, दत्तात्रय अन्नमवाड, संजय कुशवाहा, दिलीप लोखंडे, अक्षय कटारे, मंजुषा बोथीकर, साधना ढोले, देवशाला बुरकुले, शीतल अहिरराव आदींनी परिश्रम घेतले. विठ्ठल कारके, दत्तराव झोल, गोपाळराव कदम, बाबा भाबट, रामराव डख, अशोक डख, भगवानराव डख, राम डख, भगीरथ कदम, महेश डख, माणिक डख, अर्जुन शिंदे, शरद भागवत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्य सरकारच्या निजामकालीन शाळांची दुरुस्ती योजनेअंतर्गत १ कोटी ३५ लाख रुपये खर्चून, परभणी जिल्हा परिषदेकडून सर्वसोयीसुविधांनीयुक्त इमारत उभारण्यात आली आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. – अतुल डख, सरपंच, गुगळी धामणगाव ता.सेलू


दिव्यांग तपासणी शिबिराला सेलू,जिंतूरमध्ये मोठा प्रतिसाद

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!