CHANDRAYAAN-3 : सॉफ्टलँडिंगचा प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये जल्लोष; विद्यार्थ्यांनी अनुभवला अविस्मरणीय क्षण

CHANDRAYAAN-3 : सॉफ्टलँडिंगचा प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये जल्लोष; विद्यार्थ्यांनी अनुभवला अविस्मरणीय क्षण

सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानच्या परिसरात फटाक्यांचा आतषबाजी, मिठाई वाटून साजरा केला आनंद

सेलू : भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम (ISRO Moon Mission)चांद्रयान-3 ची यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग झाली. याचे थेट प्रक्षेपण बुधवार, २३ ऑगस्टरोजी एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाक्यांचा आतषबाजी करीत, मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.

चांद्रयान-3 चे 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरत्या प्रक्षेपण पार पडलं.यां दिवशी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची चंद्रयान 3 ची प्रतिकृती कार्यशाळा घेण्यात आली होती. याचेही थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले होते. या दिवशी पासूनच विद्यार्थ्यांमध्ये चंद्रयान 3 विषयी उत्सुकता वाढली होती. या कार्यशाळेत चंद्रयान 3 मिशन विषयी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती देण्यात आली.

1 ऑगस्ट रोजी चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी प्रवास सुरु केला. यानंतर आज 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘सॉफ्ट लँडिंग’ थेट प्रक्षेपण शाळेतील विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. हा सॉफ्ट लँडिंग चा थरार विद्यार्थ्यांनी अनुभवला व एकच जल्लोष केला भारत माता की जय, वंदे मातरम, जय इस्रो, चंदा मामा नहीं दूर के, वो तो अपने घर के अशा घोषणानी शाळेचा परिसर दुमदूमला.यावेळी डॉ संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व इसरो च्या चांद्रयान 3 च्या यशस्वी मिशनला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे,  प्रिंसिपल कार्तिक रत्नाला, विज्ञान विभाग प्रमुख नारायण चौरे, पर्यवेक्षक अर्जुन गरुड, बालाजी बामणे आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!