राष्ट्रीयकृत बँकेतून वेतनाचा शिक्षकांचा मार्ग मोकळा
मराठवाडा शिक्षक संघाच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश
परभणी : गेल्या काही महिन्यांपासून परभणी जिल्हा मराठवाडा शिक्षक संघाने अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांचे वेतन व भत्ते राष्ट्रीयकृत बँकेतून अदा करावीत यासाठी लोकशाही मार्गाने पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले असून, परभणी जिल्हा वेतन अधीक्षक मनोज भातलवंडे यांनी सर्व शाळांचे मासिक वेतन राष्ट्रीयकृत बँकेत मार्फत होणे बाबत मागणी मान्य करून तसे पत्र गुरूवारी, २४ ऑगस्टरोजी काढले आहे.
शिक्षकांमध्ये या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर जागृती निर्माण झाल्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षक राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावेत यासाठी आक्रमक झाले होते. जिल्हाधिकारी परभणी, शिक्षणाधिकारी परभणी, वेतन अधीक्षक परभणी यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली. शिक्षण उपसंचालक औरंगाबाद आणि शासन निर्णय वित्त विभाग यांच्या आदेशानुसार परभणी जिल्हा वेतन अधीक्षक मनोज भातलवंडे यांनी सर्व शाळांचे मासिक वेतन राष्ट्रीयकृत बँकेत मार्फत होणे बाबत मागणी मान्य करून तसे पत्र मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष यशवंत मकरंद, एन.टी. कदम, निशांत हाके, डी के देवकते यांच्याकडे सुपूर्द केले. मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांनी स्वतः याप्रकरणी वेतन अधीक्षक यांची भेट घेऊन आग्रही मागणी केली होती मराठवाडा शिक्षक संघाने लावून धरलेल्या या प्रश्नात यश मिळाल्यामुळे सर्व शिक्षक वृंद मराठवाडा शिक्षक संघाचे अभिनंदन करीत आहेत. शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सहानभूतीपूर्वक निर्णय दिल्याबद्दल मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी वेतन अधीक्षक मनोज भातलवंडे यांचे शिक्षकांच्या वतीने आभार व्यक्त केले, असे जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
परभणी जिल्ह्यातील खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, सैनिकी शाळा यांना २४ ऑगस्ट रोजी पत्र काढले आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मासिक वेतन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. संदर्भ आणि शासन निर्णयान्वये जोडपत्र अ नुसार राष्ट्रीयकृत बँकेमध्ये वेतन व भत्ते ची खाती उघडण्याबाबत निर्देश आहेत. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची इच्छा असल्यास त्यांना राष्ट्रीयकृत बँकत वेतन व भत्तेचे बँक खाते उघडण्याबाबत आपलेस्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे वेतन व भत्ते अधीक्षक मनोज भातलवंडे यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे.
आमदार बोर्डीकरांच्या संवाद मेळाव्याला तेलंगणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद