सेलूतील श्रीशंकरलिंग मंदिरात प्राणप्रतिष्ठा महोत्सव उत्साहात
पूजारी कैलासस्वामी दाम्पत्याचा संस्थानच्या वतीने सेवागौरव करण्यात आला.
सेलू : सेलू (जि.परभणी ) येथील श्रीशंकरलिंग मंदिरात श्रीगणपती, श्रीशंकर व नागदेवता, श्रीमूषक, श्रीअन्नपूर्णा माता मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा उत्सव व सेवागौरव पुरस्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या प्रसंगी विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज, नागेश स्वामी, अशोक वाडकर, जगन्नाथ चाकोते, दत्तात्रय मिटकर राजेंद्र नावाडे, रामआप्पा तोडकर, राजेंद्र महाजन, सोमनाथ सोळंके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्ताने पूजारी कैलासस्वामी व वंदना थळपती दाम्पत्याचा सेवागौरव करण्यात आला. प्रत्येकाने समाजाप्रती सहिष्णूता बाळगावी. नकारात्मकता आणि क्लेश निर्माण करणाऱ्या विचारांपासून स्वतःला दूर ठेवावे आणि आत्मशुध्दीसाठी अंतर्मनातील विचारांची घाण साफ करणे गरजेचे आहे, असे विश्वचैतन्य शिवाचार्य महाराजांनी या वेळी सांगितले. नागेश स्वामी यांनी सदाचरण व अध्यात्मिकतेचे महत्त्व सांगितले. शिवहर शिवणकर, अरुण वाडकर, अनिल वाडकर, अरुण सोळंके, गणेश अप्पा केशरखाने यांच्या हस्ते अभिषेक, महापूजा, महाआरती झाली. प्रास्ताविक मिलिंद झमकडे, सूत्रसंचालन वीरेश कडगे, तर महादेव आगजाळ यांनी आभार मानले. महाप्रसादाने सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवनस्वामी कामटे, प्रमोद स्वामी थळपती, विश्वनाथ हुगे, पवन मिटकरी, शुभंम सोळंके, शाम राऊत आदींसह श्रीशंकरलिंग मंदिर संस्थानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीयकृत बँकेतून वेतनाचा शिक्षकांचा मार्ग मोकळा; मराठवाडा शिक्षक संघाच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश