Sports : शालेय बुद्धिबळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; सेलूतील न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये आयोजन
सेलू जि.परभणी : प्रशासनाच्या वतीने सेलू (जि.परभणी) येथील न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये सोमवारी आयोजित सेलू तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.
परभणी जिल्हा क्रीडाधिकारी व गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पर्धां आयोजिण्यात आल्या होत्या. उद्घाटक म्हणून यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक साईराज बोराडे उपस्थित होते. संयोजक गणेश माळवे, मुख्याध्यापक जीवन बोराडे, अमर सुरवसे यांची उपस्थिती होती. बुध्दीबळ स्पर्धा जीवनासाठी दिशादर्शक आहेत. विविध स्पर्धांमध्ये खेळाडूंनी सातत्याने सहभागी व्हावे, असे आवाहन बोराडे यांनी या वेळी केले. स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षे या तीन गटातील मुले व मुलींचे १२ शाळांतील १२९ खेळाडू सहभागी झाले होते. पंच म्हणून सचिन शहाणे, शुभम शहाणे, वाणीश्री रासकटला उपस्थित होते. सूत्रसंचालन लता नावाडे यांनी केले. सगीर फरोकी यांनी आभार मानले.