Charcha : ‘स्वामी’जींनी जागेवर जाऊन खडसावले; सेलूतील ‘त्या’ बांधकामाचे ?
कॉलेजरोडवरील अनाधिकृत शेड बांधकामाचे पितळ उघडे !
सेलू जि.परभणी : मूळ मालकाला अंधारात ठेवून एखाद्या जागेवर अनाधिकृत ताबा मिळविणे; तसेच आजुबाजुची जागाही माझ्याच मालकीची असल्याचा कांगावा करीत, नियमबाह्य शेड बांधकामाचा घाट घालून घाईगडबडीत ते सुरूही करणे. आणि नागरीवसाहतीमध्ये चक्क ‘हॉटेल’ व्यवसाय थाटण्याच्या धाडसाचा हा चर्चित प्रकार ‘त्या’ व्यावसायिकाला चांगलाच महागात पडण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी, २९ ऑगस्टरोजी स्वामीजींनी जागेवर जाऊन संबंधितांना चांगलेच खडसावले. यामुळे चर्चेला दुजोरा मिळाला आहे.
या प्रकाराचा एक व्हिडिओदेखील समाज माध्यमातून व्हायरल झाला आहे. या संदर्भात सविस्तर माहिती अजुन कळू शकली नाही. मात्र, सदरील व्यावसायिकाचे नगरपालिका प्रशासनाशी अत्यंत जवळचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. या व्यावसायिकांने समतानगरमधील कॉलेज रोडवरील मोक्याची जागा बळकावल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. नागरिकांनीही या हॉटेल शेड बांधकामांला विरोधाचा पावित्रा घेतला आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास जागेच्या मूळ मालकाशी संबंधित स्वामीजींनी जागेवर जाऊन खरे-खोटे काय? याची शहानिशा केली. “काम बंद करा.” असे सुनावले. यामुळे चर्चेला अधिक दुजोरा मिळाला आहे. दरम्यान, मंगळवारी प्रकरण गंभीर होत असल्याचे लक्षात येताच संबंधित व्यावसायिकाने लपवालपवीचा आणि “माझंच खरं” चा खेळ सुरू केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. खोट्या नाण्याचा आवाज भदभदणारच. त्याप्रमाणे ‘त्या’ अनाधिकृत शेड बांधकामांचे पितळ उघडे पडले आहे. आता आणखी पुढे काय घडते ? याची उत्सुकता आणि चर्चाही परिसरातील नागरिकांसह सेलू शहरात सुरू झाली आहे.
नगरपालिका प्रशासनातील काही मोजकी मंडळी वैयक्तिक स्वार्थापोटी काय करू शकत नाहीत, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरूच आहे. अशातच समतानगरमधील कॉलेजरोडवरील अनाधिकृत हॉटेल शेड बांधकामांसंदर्भात मंगळवारी घडलेल्या प्रकाराने चर्चेत आणखी भर पडली आहे.
Viral Video पाहा…
हुतात्म्यांच्या बलिदानातून हैदराबाद मुक्तिसंग्राम यशस्वी : ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव