Pran Pratishthapana : श्री महेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळा; सेलूतील श्रीसाईबाबा मंदिरात तीन दिवस भरगच्च कार्यक्रम

Pran Pratishthapana : श्री महेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळा; सेलूतील श्रीसाईबाबा मंदिरात तीन दिवस भरगच्च कार्यक्रम

सेलू जि.परभणी : येथील महेशनगरातील श्री साईबाबा मंदिरामध्ये श्री महाबलीपुरम (तामिळनाडू) येथून आणलेल्या श्री महेश्वर शिवलिंगाची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा पाच ते सात सप्टेंबर या कालावधीत आयोजिण्यात आला आहे. यानिमित्ताने तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
मंगळवार दि.०५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता प्राणप्रतिष्ठा पूजा, गणपती पूजन, स्वस्ती पुण्यवाचन, मातृकापूजन, नान्दीश्राद्ध आचार्यवर्णन, देवता स्थापना, जलाधीवास, आरतीनंतर रात्री ८.०० वाजता संतोष महाराज आढवणे यांचे हरिकिर्तन होईल. बुधवार दि.०६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. प्राणप्रतिष्ठा पूजा, अग्निस्थापणा, नवगृह स्थापणा हवन, मुख्यदेवता हवन, धान्यादिवास, शय्यादिवास, निद्रा आवाहन व आरती व रात्री ८.०० वाजता माणिक महाराज रेंगे यांचे हरिकिर्तन होईल. गुरुवार दि.०७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. प्राणप्रतिष्ठा पूजा, महाअभिषेक होईल, बलिदान पुर्णाहूती, आरतीनंतर वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सद्गुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, साखरखेर्डा, सद्गुरू सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज, साखरखेर्डा, सद्गुरू काशिनाथ शिवाचार्य महाराज, पाथरी, सद्गुरू विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज, आष्टी यांच्या दिव्य साक्षीने व मंत्रोच्चाराने कार्यक्रम संपन्न होत आहे. रात्री ८.०० वाजता शिवा महाराज बावस्कर यांचे हरिकिर्तन होईल.

सोहळ्यामध्ये गायनाचार्य माऊली महाराज चव्हाण, वारकरी भूषण गजानन महाराज मुंडे, सोपान महाराज चव्हाण, संगीतसाथ मृदंगविशारद कार्तिक महाराज हिंगणे, कृष्णा महाराज जाधव, नवनाथ महाराज गायकवाड यांची साथसंगत लाभणार आहे. याप्रसंगी मृदंगमहामेरू भरत महाराज पठाडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.‌

गुरूवार ७ सप्टेंबर २०२३ रोजी श्री महेश्वर शिवलींग स्थापनेनंतर दुपारी १२ ते सायंकाळी ६:३० या वेळेत सेलू शहरातील सर्व भाविक भक्तांच्या हस्ते बारा ज्योतीलिंगातील तीर्थ व भारतातील प्रमुख नद्यांच्या आणलेल्या पाण्याने श्री महेश्वर शिवलींगाचा जलाभिषेकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर एक लोटा जल अर्पण करणाऱ्यास हरिद्वार येथून सिध्द केलेले प्रसादरुपी रुद्राक्ष, विभुती व शिवलीलामृत पोथीचे वाटप होणार आहे. सायंकाळी ६:३० वाजता श्री महेश्वर शिवलिंगाची महाआरती होईल. आरतीचे ताट मंदीरातून मिळेल असे संयोजकांनी कळविले आहे. सर्व सद्भक्तांनी कीर्तन व विविध कार्यकमांचा लाभ घ्यावा. जलाभिषेक (एक लोटा जल) अर्पण करुन पुण्यार्जन करावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

गुरूवार ७ सप्टेंबर २०२३ रोजी श्री महेश्वर शिवलिंग स्थापनेनंतर दुपारी १२ ते सायंकाळी ६:३० या वेळेत सेलू शहरातील सर्व भाविक भक्तांच्या हस्ते बारा ज्योतीलिंगातील तीर्थ व भारतातील प्रमुख नद्यांच्या आणलेल्या पाण्याने श्री महेश्वर शिवलिंगाच्या जलाभिषेकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर एक लोटा जल अर्पण करणाऱ्यास हरिद्वार येथून सिध्द केलेले प्रसादरुपी रुद्राक्ष, विभुती व शिवलीलामृत पोथीचे वाटप होणार आहे. जलाभिषेक (एक लोटा जल) अर्पण करुन पुण्यार्जन करावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Pran Pratishthapana : श्री महेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळा; सेलूतील श्रीसाईबाबा मंदिरात तीन दिवस भरगच्च कार्यक्रम


हुतात्म्यांच्या बलिदानातून हैदराबाद मुक्तिसंग्राम यशस्वी : ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!