GST : परभणीचे भूमिपुत्र गोपालकृष्ण यादव राज्य कर उपायुक्तपदी

GST : परभणीचे भूमिपुत्र गोपालकृष्ण यादव राज्य कर उपायुक्तपदी

परभणी : महाराष्ट्र शासनाने वस्तू व सेवा कर विभागातील अधिकाऱ्यांना राज्यकर उपआयुक्त पदावर बढती दिली आहे. यात परभणी जिल्ह्यातील गोपालकृष्ण तुकाराम यादव यांची राज्य कर उपआयुक्त म्हणून पदोन्नती झाली. त्यांना मुंबई येथे माझगावच्या मुख्य कार्यालयात नियुक्ती मिळाली आहे.
श्री.यादव हे मानवत तालुक्यातील रामपुरी (बारा हनुमंताची) गावचे मूळ रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण रामपुरी व परभणीत झाले. अकरावी-बारावीला ते वसमत (जि.हिंगोली) येथील अन्नपुर्णा कनिष्ठ महाविद्यालयात शिकायला होते. त्यानंतर यवतमाळ येथे डीएमएम महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.एम.एस.ची पदवी संपादन केले. पदवीधर झाल्यापासून ते परभणी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. 2012 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे गोपालकृष्ण यादव यांची मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी पदावर निवड झाली. तेथे त्यांनी 2 वर्षे काम केले. त्यानंतर 2014 मध्ये सहायक राज्यकर आयुक्त पदावर त्यांची निवड झाली. त्यांनी 2014 ते 2017 आणि 2017 ते 2020 असे दोन वेळा औरंगाबाद येथे काम केलेले आहे. त्यांनतर 2020 पासून ते ठाणे येथे सहायक राज्यकर आयुक्त पदावर कार्यरत होते.  सहायक राज्यकर आयुक्त गोपालकृष्ण यादव यांनी सन 2020-23 या वर्षातील कार्यालयीन कामात अतिउत्कृष्ट कामगिरी केली. याबद्दल 1 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र शासन, वस्तू व सेवाकर दिनी अप्पर राज्यकर आयुक्त कार्यालय ठाणे येथे राज्यकर सहआयुक्त बळवंत टोपे, अप्पर राज्यकर आयुक्त प्रसाद जोशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून त्यांना गौरविण्यात आले. आता राज्य कर उपआयुक्त पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सहायक राज्यकर आयुक्त गोपालकृष्ण यादव यांनी सन 2020-23 या वर्षातील कार्यालयीन कामात अतिउत्कृष्ट कामगिरी केली. याबद्दल 1 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र शासन, वस्तू व सेवाकर दिनी अप्पर राज्यकर आयुक्त कार्यालय ठाणे येथे राज्यकर सहआयुक्त बळवंत टोपे, अप्पर राज्यकर आयुक्त प्रसाद जोशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून त्यांना गौरविण्यात आले. आता राज्य कर उपआयुक्त पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


हुतात्म्यांच्या बलिदानातून हैदराबाद मुक्तिसंग्राम यशस्वी : ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!