चिमुकल्यांनी बांधल्या पोलिसांना राख्या; सेलूतील नूतन प्राथमिक शाळेचा उपक्रम
सेलू (जि.परभणी) : येथील सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेतील कब आणि बुलबुल पथकातील चिमुकल्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधून बुधवारी रक्षाबंधन साजरा केला.पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी पंजाब पोलिस दलातील गुरमित सिंग, सुरेंद्र सिंग, दामिनी पथकाच्या मोरे, पोलिस कर्मचारी मामीलवाड, जाधव, मुंडे, मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे, अनिल रत्नपारखी, उल्हास पांडे, कुबरे, महामुनी, कुंभार आदींची उपस्थिती होती.