Scholars : विविध क्षेत्रात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक; सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रम
सेलू : येथील एलकेआरआर प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक गुरूवारी, ३१ ऑगस्टरोजी करण्यात आले. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, महेशकुमार चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.चंदन पाटील, प्राचार्य कार्तिक रत्नाला आदींची उपस्थिती होती. शाळेच्या तेजस्वी महेशकुमार चौधरी ( इयत्ता सहावी) हिची नासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली. तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये श्रेया गायकवाड, कार्तिकी जाधव, अनुष्का चव्हाण, अनिकेत आंबेकर, व्हिजन खाडे, संस्कार व्हॅनराव, योगा स्पर्धेमध्ये वैशाली कवळे, शिवकन्या काळे, दुर्गा माहुरे यांची निवड झाली. तसेच जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेमध्ये चौदा, सतरा व एकोणवीस वर्षाखालील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या सर्व यशस्वीतांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
या वेळी महेशकुमार चौधरी यांनी मार्गदर्शन केले. नासाच्या प्रशिक्षणासठी तेजस्वीची निवड कशी झाली. त्यासाठी करावयाचा अभ्यास याची माहिती दिली. हे प्रशिक्षण अमेरिका व सिंगापूर येथे आठ दिवस होणार आहे, असे सांगितले. डॉ.चंदन पाटील यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले व हिबारे यांनी आभार मानले