शिक्षक गुणगौरव : योगेश ढवारे, छाया गायकवाड यांना राज्य सरकारचा पुरस्कार

शिक्षक गुणगौरव : योगेश ढवारे, छाया गायकवाड यांना राज्य सरकारचा पुरस्कार

सेलू जि.परभणी : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील प्राथमिक शिक्षक योगेश बळीराम ढवारे व परभणी येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील माध्यमिक शिक्षिका छाया गायकवाड यांना राज्य सरकारचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने शुक्रवारी, एक सप्टेंबर रोजी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील गायकवाड व ढवारे यांचा समावेश आहे. राज्यातील ३७ प्राथमिक व ३९ माध्यमिक, आदीवासी क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणारे १९ प्राथमिक शिक्षक, थोर समाजसुधारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी ८, विशेष शिक्षक कला व क्रिडासाठी २, दिव्यांग शिक्षक एक, स्काऊटगाईड दोन अशा एकूण १०८ शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्काराबद्दल गायकवाड व ढवारे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!