हातनूरमार्गे वालूरला बस सुरू करा : विद्यार्थ्यांची मागणी
रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
सेलू : सेलू ते वालूर मार्गे हातनूर ही बस गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हातनूर, साळेगाव, खेर्डा येथील शेकडो विद्यार्थी वालूर येथे रोज शिकायला जातात. बस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. चालू असलेली बस बंद का केली हा प्रश्न आहे. तरी सेलू -वालूर मार्गे हातनूर ही बस ताबडतोब सुरू करण्यात यावी. अन्यथा मोरेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी आगार प्रमुख, पाथरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सेलूचे वाहतूक नियंत्रक वसंतराव बोराडे यांनी हे निवेदन स्वीकाराले. या वेळी जयसिंग शेळके, अभिषेक आंधळे, तुकाराम निर्वळ, दिपक घिसे, शैलेश राऊत, ओंकार गोरे, कृष्णा आंधळे, प्रतिक आबूज, युवराज माळवोदकर, अर्जून आंधळे, ओमकार आंधळे, नागेश गोरे, तनमय नागटीळे, विठ्ठल चव्हाण, विठ्ठल निर्वळ व विद्यार्थी उपस्थित होते.