अभिमानास्पद : शिक्षक योगेश ढवारेंच्या उपक्रमशीलतेचा राज्य सरकारकडून सन्मान
सेलूशहर परिसरासह जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव; विविध नावीण्यपूर्ण उपक्रम ठरले यशस्वी
सेलू जि.परभणी : येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील शिक्षक तथा कवी योगेश बळीराम ढवारे यांच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमशीलतेचा राज्य सरकारकडून सन्मान करण्यात आला आहे. राज्य सरकारचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार ढवारे यांना जाहीर झाला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी, एक सप्टेंबर रोजी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये ढवारे यांचा समावेश आहे. सेलू शहर व परिसरातील शिक्षकाचा बर्याच कालावधीनंतर राज्य सरकारच्या पुरस्काराने गौरव होत आहे. या बद्दल शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातून ढवारे यांचे अभिनंदन होत आहे.
योगेश ढवारे यांचा थोडक्यात कार्य परिचय : पूर्ण नाव : श्री योगेश बळीराम ढवारे, शाळा : श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय, सेलू जि.परभणी, अध्यापनाचा अनुभव – १७ वर्षे
सामाजिक व शैक्षणिक उपक्रम
१. साने गुरुजी कथामालातर्फे शिक्षकांसाठी विभागीय कथाकथन स्पर्धेचे मराठवाडास्तरीय आयोजन करताना संयोजन समिती सदस्य
२. हात मदतीचा या वंचित मुलांसाठी बहुपयोगी उपक्रमाचे सदस्य
३. शाळेतील दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेतले व त्यांच्या संपूर्ण वर्षभराचा खर्च करणार आहे.
४. ज्ञानरचनावादी व डिजिटल संस्था म्हणून खाजगी शाळेतून
पहिली श्री.के.बा विद्यालय होण्यात महत्वाचा वाटा. स्वतः एक पगार म्हणजे ३० हजार रूपये वर्गासाठी खर्च करून इतरांना प्रेरणा दिली. हळूहळू सर्वच्या सर्व म्हणजे १७ वर्ग डिजिटल व ज्ञानरचनावादी केले.
या उपक्रमास आजवर शिक्षण संचालक प्राथमिक सुनील चव्हाण तथा, आयबीएन लोकमत तत्कालीन संपादक डाॅ.उदय निरगुडकर, भागवत कथाकार वा.ना उत्पात या मान्यवरांच्या भेटी. वा.ना उत्पात यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार.
५. सेलू येथील पहिले राज्यस्तरीय एल्गार साहित्य संमेलन संयोजन समिती मध्ये उपाध्यक्ष म्हणून यशस्वी सहभाग.
६.गीता परिवार सेलू संचालित रौप्य महोत्सवी वासंतिक बालसंस्कार शिबीरात संयोजन समिती सदस्य
७.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा गुजरात २०१८ चे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख यांच्या वाचक संवाद या विद्यार्थी व शिक्षक तथा पालक यांच्या मधील संवादरूपी कार्यक्रमाचे संयोजन.
८.विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन व संयोजन.
९.योगेश ढवारे नावाचे स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे तसेच ब्लाॅगचे काम सुरू आहे.
१०. डिजिटल शाळा शोधनिबंध ३६ जिल्ह् त फक्त परभणी जिल्हा पूर्ण असून त्या शोधनिबंधास मा.सहसंचालक यांच्या हस्ते सन्मान प्राप्त.
११.सर्व रोगनिदान जिल्हास्तर शिबीराचे आयोजन व संयोजन
विविध पुरस्कार, सहभाग, सादरीकरण
२०१२-अथर्व ट्रस्ट डोंबिवलीचा राज्यस्तरीय कलाश्री कलाविष्कार हा पुरस्कार
२०१६- कुणबी प्रतिष्ठान महाराष्ट्रचा आदर्श गुरूरत्न पुरस्कार
२०१६- सुप्रसिद्ध भागवतकथाकार वा.ना उत्पात यांच्या हस्ते उपक्रमशील शिक्षक म्हणून सत्कार
२०१७- साने गुरुजी कथामाला जालना चा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार
२०१७- राष्ट्रीय प्रशिक्षण सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार च्या प्रशिक्षणात मराठवाड्यातून यशस्वी सहभाग
, देशातून द्वितीय क्रमांक प्राप्त.विशेष म्हणजे सेलूतील सर्व संस्थांमधून राष्ट्रीय प्रशिक्षणास निवड झालेले आजपर्यंतचे एकमेव शिक्षक.
२०१८- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा गुजरात येथील कविकट्टा या कार्यक्रमासाठी निवड व घालमेल या कवितेचे सादरीकरण
२०१८- सेलू शहर उत्कृष्ट स्वच्छतादूत म्हणून सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते स्वच्छतादूत सन्मान
२०१८- पहिले राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन पुणे येथे यशस्वी सहभाग.
२०१८- सुवर्ण महोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा नूतन महाविद्यालय सेलूच्या माजी विद्यार्थी सन्मान सोहळ्यात सांस्कृतिक व शैक्षणिक तथा सामाजिक कार्याबद्दल उत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार
२०१८- महाराष्ट्र शासनातर्फे २०१७-१८ या वर्षीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार राज्यस्तरीय मुलाखतीसाठी निवड.
२०१८- वनिता फाऊंडेशन महाराष्ट्र चा राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षण क्रांतीरत्न पुरस्कार
२०१८- राजवैद्य सोशल फाऊंडेशन चा महाराष्ट्र शिक्षणरत्न पुरस्कार
२०१८- आजाद एज्युकेशन सोसायटीचा राज्यस्तरीय आदर्श गुरूगौरव पुरस्कार सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते किरण कुमार यांच्या हस्ते वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात सम्मानपूर्वक प्रदान
२०१८- युनेस्को संचलित विश्वशांतीदूत पुरस्कार जाहीर. यवतमाळ येथे दि. ६ ऑक्टोबर ला युनेस्को अध्यक्ष आदित्य तरे व पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते वितरण. २०१८- टोंगा देशाचा मोस्ट इनोवेटीव टिचर हा अंतरराष्ट्रीय पुरस्कार १६ देशाच्या राजदूतांच्या हस्ते प्राप्त. २०१८-भारत सरकारच्या नॅशनल युथ फेडरेशन नवी दिल्लीचा राष्ट्रीय युवा आदर्श शिक्षक पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते प्राप्त. २०१९-महाराष्ट्र शासन व सलाम मुंबई फाऊंडेशनचा राज्यस्तरीय शाळा भूषण पुरस्कार. विशेष म्हणजे तीन विद्यार्थ्यांना शालेय रत्न पुरस्कार. २०१९- शोधनिबंधाची राष्ट्रीय स्तरावर निवड व राष्ट्रीय शोधनिबंध पुस्तिकेत शोधनिबंध प्रकाशित, २०२०- नवोपक्रम निवडीबद्दल पाठ्यपुस्तक मंडळाच्या अध्यक्ष डॉ शकुंतला काळे, शिक्षण उपसंचालक डॉ शोभा खंदारे यांच्या हस्ते सन्मान. तसेच शिक्षणाधिकारी परभणी डॉ सुचिता पाटेकर यांच्या कडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान. २०२०- बालभारती पुणे येथे महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी राज्यस्तरीय वर्चुअल क्लास साठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड. २०२१- दिक्षा एपसाठी निवड व ८ ते १२ शैक्षणिक ई साहित्य निर्मिती. २०२२-आजवर दहा विदयार्थी शिष्यवृत्ती धारक तयार केले.
लेखन व साहित्य
१. ISBN सह पुस्तकांचे लेखन
२.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या नवी पहाट या पुस्तकात बालरक्षक यशोगाथा प्रकाशित.
३.युनिसेफ च्या पुस्तकात कोविड काळातील कार्याची दखल व लेख प्रकाशित
४.कोविड काळातील स्वाध्याय या online उपक्रमात जिल्हा स्तरावर सहभागी
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. याचा मनापासून आनंद होतोय. हे यश माझे एकट्याचे नसून आजवरचे माझे मार्गदर्शक सर्व सहकारी शिक्षक, आई वडील, विशेष म्हणजे माझे विद्यार्थी आणि संस्थेचे संचालक मंडळ या सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे हे यश संपादन करता आले. मागील ३ वर्षांपासून जिल्हा, विभाग, राज्य या निवड प्रक्रियेतून जात होतो. राज्यस्तरावर पात्र होऊनही अंतिम निवड होत नव्हती. पण सातत्य व जिद्द बाळगून प्रयत्न केले. सर्व संघर्षमय प्रक्रियेतून जाऊन या वर्षी शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. माझ्या श्री केशवराज बाबासाहेब विदयालय शाळेच्या आणि सेलू शहराच्या नावलौकिकात भर पडली याचा मोठा हर्ष आहे. – योगेश ढवारे, शिक्षक, श्री के.बा.विद्यालय, सेलू