LIC : सेलूतील एलआयसी शाखेत विमा उत्सवाला सुरूवात; विविध कार्यक्रमांचे आयोजन

LIC : सेलूतील एलआयसी शाखेत विमा उत्सवाला सुरूवात; विविध कार्यक्रमांचे आयोजन

सेलू : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेत ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त विमा सप्ताह, विमा उत्सवाला शुक्रवारी, एक सप्टेंबररोजी उत्साहात सुरूवात झाली. अध्यक्षस्थानी शाखा प्रबंधक संतोष कोडगीरकर होते. उद्घाटक म्हणून तहसीलदार दिनेश झांपले, प्रमुख अतिथी मुकुंद आष्टीकर यांची उपस्थिती होती.

आतापर्यंत एलआयसीने अनेक टप्पे पार केले आहेत.  जीवन विमा व्यवसायाच्या विविध पैलूमध्ये अभुतपूर्व कामगिरीचे विक्रम प्रस्थापित केले आहेत. भारतीय विम्याच्या उदारीकरण परिस्थिती ही एलआयसी प्रबळ जीवन कंपनी आहे आणि स्वतःच्या भूतकाळातील विक्रमांना मागे टाकून नवीन वाढीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे. वरील बाबी लक्षात घेता विमा सप्ताह साजरे करताना सर्व क्रिया कलापांचा उदेश सामाजिक उपक्रमांद्वारे ब्रांड एलआयसीची दृशय मानता सुधारणे हा असावा. एलआयसीने केलेले योगदान ठळक केले जाणार आहे आणि भागधारकांसह सर्व भागधारकांना उपक्रमांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील, संपूर्ण आठवडाभर उत्सव आयोजित करण्यासाठी विस्तुत मार्गदर्शक तत्वे आहेत. अशी माहिती या वेळी देण्यात आली.

शुक्रवारी समारंभाच्या निमित्ताने कार्पोरेट राष्ट्र गीत व कार्पोरेट प्रतिज्ञा घेण्यात आली. जेष्ठ कर्मचाऱ्यांचा सत्कार, शिक्षक दिन, एजेंट डे, गुरू दिवस. कर्मचाऱ्यां साठी निबंध स्पर्धा आदी उपक्रम विमा उत्सवात आयोजित करण्यात आले आहेत. या वेळी शमशोद्दी न शेख, उपेंद्र बेल्लुरकर, भास्कर हिप्परगे, किरण गुंडेकर, कृष्णा बोराडे, डॉ.अनिल शेळके, संपत कपाळे यांनी  मनोगत व्यक्त केले. अविनाश जोशी, सुनील वाकडे, शिवाजी अघाव, शंभू काकडे, अजय पुंडलिक, गोपाल गाडगे, श्रीपती जगताप, प्रदिप कनकटे, भरत कोलते, शुभम जोशी, अमर पाटील, कृष्णा बोराडे, भालचंद्र बरडे, मन्मथ देवडे, राजकुमार नाईकवाडे, शंकर जिवणे, अरुण साळवे, गजानन वाकडीकर, संदीप जाधव, एकनाथ हिंगे, संजय मनियार, निलवर्ण, रवि सराफ, देवदत्त वाघमारे, दामोधर काकडे, बंडु कटारे, अमिर शेख, नितीन भिसे, गोविंद कारके आदिंची उपस्थिती होती

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!