गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : बळीराजा संघर्ष समिती
अंतरवाली लाठी हल्ल्याच्या घटनेचा सेलूत तीव्र निषेध
सेलू जि.परभणी : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटा येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध येथे नोंदविण्यात आला. या वेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. बळीराजा संघर्ष समिती सेलूच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना शनिवारी, दोन सप्टेंबररोजी निवेदन देण्यात आले. लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. माजी सभापती अशोक काकडे, कॉम्रेड रामेश्वर पौळ, रामेश्वर गाडेकर, रमेश माने, रमेश डख, अशोक उफाडे, छगन शेरे, विजय भुजबळ, दत्तूसिंग ठाकूर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. या दरम्यान पोलिसांनी उपोषणकर्त्यावर अमानुषपणे लाठी हल्ला करून हवेत गोळीबार केला. यात दीडशेहून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध करत दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. संदीप घुगे, राजकिशोर जैस्वाल, ॲड. प्रभाकर गिराम, ज्ञानेश्वर उबाळे, मुंजाभाऊ डोंबे, मुंजाभाऊ काष्टे, संतोष खाडप, कल्याण पवार, उद्धवराव वाघ, शफिक अली खान, पंढरीनाथ मोरे, महादेव मगर, लक्ष्मण झिंबरे, महादेव पडघन, सतीश घुमरे, गणेश काष्टे, विजय काकडे सुधाकर शेवाळे, विश्वनाथ काष्टे, भारत इंद्रोके, जगन भाबट, बाबाराव जोगदंड, बाळू शिंदे, सुनील साळेगावकर, उद्धव खोसे, शिवराम कदम, राहुल कदम, अक्षय कदम, बाळासाहेब बरसाले, श्रीराम कुलकर्णी, सुखानंद सोळंके, बबन साबळे, बळीराम मगर, संतोष घुमरे आदी उपस्थित होते. निवेदनावर अशोक काकडे, रामेश्वर पौळ, रामेश्वर गाड़ेकर आदींसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
शालेय क्रिकेट स्पर्धा : ‘नूतन’, ‘न्यू मॉर्डन’ ला विजेतेपद, ‘व्हिजन’ उपविजेता