शालेय क्रिकेट स्पर्धा :  ‘नूतन’, ‘न्यू मॉर्डन’ ला विजेतेपद, ‘व्हिजन’ उपविजेता

शालेय क्रिकेट स्पर्धा :  ‘नूतन’, ‘न्यू मॉर्डन’ ला विजेतेपद, ‘व्हिजन’ उपविजेता

सेलू तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत १६ संघाचा सहभाग

शालेय क्रिकेट स्पर्धा :  'नूतन', 'न्यू मॉर्डन' ला विजेतेपद, 'व्हिजन' उपविजेता

सेलू : क्रीडा व युवक सेवासंचालनाय पुणे, जिल्हाक्राडाधिकारी कार्यालय परभणी, पं.स.गटशिक्षणाधिकारी कार्यालय व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त सहकार्याने शुक्रवारी १ सप्टेंबररोजी येथील नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सेलू तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडल्या. शनिवारी अंतिम सामने झाले. विविध गटात न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, नूतन विद्यालय संघाने विजेतेपद पटकावले, तर व्हिजन इंग्लिश स्कूल उपविजेता ठरला.

उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर होते. माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, प्राचार्य डॉ.उत्तमराव राठोड, प्रा.डॉ.के.के.कदम यांची उपस्थिती होती.  या वेळी बोलतांना प्राचार्य कोठेकर म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानावरील खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. खेळातून जबाबदारीची जाणीव होते. त्यातूनच यशाचा मार्ग मिळतो.
स्पर्धेत तालुक्यातील १४, १७ व १९ वर्षे आतील मुले व मुलींच्या एकूण १६ संघांनी सहभाग नोंदवला.
गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, नायब तहसीलदार अनिकेत पालकवाड, अभियंता वाघमारे, प्रा.महेश कुलकर्णी यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर गजानन साळवे यांनी आभार मानले.
शनिवारी, २ सप्टेंबररोजी नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर नूतन संस्था अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया व सदस्य प्रकाशचंद्र बिनायके, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड,ॲड जितेंद्र घायतडक, प्रा.खापरखुंटीक यांच्या उपस्थिती उपांत्य व अंतिम फेरीतील सामने झाले. पंच म्हणून कपील ठाकुर, प्रमोद गायकवाड, सूरज शिंदे, अलीम पठाण, जगदीश लहाने, विजय सोंजे, प्रशांत नाईक, मसुद अन्सारी, जुलाह खुद्दुस,सगीर फारोकी, अमर सुरवसे, लक्ष्मण सोळंके, चंद्रकांत गटकळ , लक्ष्मीकांत फटाले, अमर ठाकूर आदी क्रीडा शिक्षकांनी काम पाहिले.

विजयी संघ असे : १७ वर्षे मुली : प्रथम – न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, व्दितीय : व्हिजन इंग्लिश स्कूल, १४ वर्षे मुले : प्रथम – न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल सेलू, व्दितीय- व्हिजन इंग्लिश स्कूल, १७ वर्षे मुले : प्रथम – नूतन विद्यालय सेलू, व्दितीय- न्यू मॉर्डन इंग्लिश स्कूल, सेलू


गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : बळीराजा संघर्ष समिती 🔸अंतरवाली लाठी हल्ल्याच्या घटनेचा सेलूत तीव्र निषेध

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!