Study Desk : विवेकानंद शाळेतील चिमुकल्यांना अभ्यासाच्या सुविधा
सेलूतील मालाणी परिवार, शेक हँड फाउंडेशनचा साह्याभूत उपक्रम : स्व.डॉ.भागचंदजी स्व.सौ.सरला मालाणी यांच्या स्मृति जागविल्या
सेलू : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयाला डॉ.सुजित मालाणी व सौ उज्वलाताई मालाणी यांच्यावतीन इयत्ता पहिली व दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांसाठी १२० स्टडी डेस्क भेट देण्यात आले. तसेच शेक हँड फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. स्वर्गीय डॉ. भागचंदजी मालाणी आणि स्व.सरलाताई मालाणी यांच्या संस्काराच्या छायेत वाढलेल्या मालाणी परिवाराने दातृत्वाचा गुण जपत शाळेस डेस्क उपलब्ध करून दिले. या वेळी व्यासपीठावर स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर, मुख्याध्यापक शंकर शितोळे, शिवनारायण मालाणी, आनंद मालाणी, गिरीश मालाणी, डॉ.सुदर्शन मालाणी, गोविंद कासट, डॉ.सुबोध माकोडे,डॉ.सतीश लिपणे, विधीज्ञ सुभाष भरदम, दिलीप बेदरकर, कृष्णा पांचाळ यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.सुजित मालाणी यांनी डेस्क देण्यामागील उद्देश सांगितला. मुलांना पाठ व मानेचा त्रास होऊ नये व अक्षरे सुधारण्यासाठी मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्यात मालाणी कुटुंबीय हिरीरीने सहभागी आहेत. यापुढे राहू असे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक राजूरकर यांनी केले, तर आभार रागिणी जकाते यांनी मानले. या वेळी ‘वंदे मातरम’ने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमासाठी काशिनाथ पांचाळ, दिपाली पवार, शारदा पुरी, चंदू कव्हळे, चेतन नाईक यांनी परिश्रम घेतले.