बापलेकीच्या ‘वक्तृत्वाचा दीपस्तंभ’‌ पुस्तकाचे प्रकाशन

बापलेकीच्या ‘वक्तृत्वाचा दीपस्तंभ’‌ पुस्तकाचे प्रकाशन

सुरेश व अनुष्का हिवाळेंच्या संयुक्त लेखनाचा‌ आविष्कार 

परभणी : सेलू येथील नूतन विद्यालयातील शिक्षक तथा कवी सुरेश हिवाळे आणि त्यांची लेक अनुष्का यांच्या संयुक्त लेखनाचा पहिला आविष्कार असलेल्या ‘वक्तृत्वाचा दीपस्तंभ’ पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन परभणीतील राजगोपालाचारी उद्यानात शनिवारी दोन सप्टेंबररोजी झाले.

याप्रसंगी गझलकार अरविंद सगर, त्र्यंबक वडसकर, गंगाधर गायकवाड, माणिक पुरी, प्राध्यापक हनुमान व्हरगुळे, मारोती डोईफोडे, शरद ठाकर, माधव गव्हाणे यांची उपस्थिती होती. या वेळी गझलकार अरविंद सगर म्हणाले की, ” शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात वकृत्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना संहितेची पहिली अडचण असते. ही संहितेची अडचण सुरेश हिवाळे व अनुष्का हिवाळे यांच्या ‘ वक्तृत्वाचा दीपस्तंभ’ या पुस्तकाने दूर होईल. सोबतच शालेय वक्त्यांना वक्तृत्वाची संहिता कशी असावी. याचे मार्गदर्शनही ‘वक्तृत्वाचा दीपस्तंभ’ या पुस्तकातून मिळेल. सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर यांनी केले. प्राध्यापक हनुमान व्हरगुळे यांनी आभार मानले.

बापलेकीच्या 'वक्तृत्वाचा दीपस्तंभ'‌ पुस्तकाचे प्रकाशन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!