‘त्या’शेडचे बांधकाम थांबविले; सेलूच्या मुख्याधिकाऱ्यांनी बजावली नोटीस
सेलू : एका चॅरिटेबल ट्रस्टच्या मूळ मालकाला अंधारात ठेवून नागरीवसाहतीमध्ये चक्क ‘हॉटेल’ व्यवसाय थाटण्याचे धाडस करणाऱ्या संबंधित व्यावसायिकाला सेलू पालिका मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. काम तात्काळ थांबवावे, अशा आशयाची ही नोटीस असल्याचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी रविवारी, तीन सप्टेंबररोजी सांगितले.
समतानगरमधील कॉलेजरोडवरील मोक्याची जागा एकाने बळकावल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. नागरिकांनीही या हॉटेल शेड बांधकामांला विरोधाचा पावित्रा घेतला आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी, २९ ऑगस्टरोजी दुपारी चारच्या सुमारास जागेच्या मूळ मालकाशी संबंधित ट्रस्टच्या स्वामीजींनी जागेवर जाऊन खरे-खोटे काय? याची शाहनिशा केली. “काम बंद करा.” असे सुनावले. अखेर ‘त्या’अनाधिकृत शेड बांधकामांचे पितळ उघडे पडले. त्यानंतर या संबंधीत ट्रस्टच्या वतीने उचित कार्यवाही सुरू करण्यात आली. या अनुषंगाने मुख्याधिकार्यांनी सर्वसंबंघितांना याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
Charcha : ‘स्वामी’जींनी जागेवर जाऊन खडसावले; सेलूतील ‘त्या’ बांधकामाचे ?