Aantarwali Lathihalla : सरकारला धाडला बांगड्यांचा आहेर; सेलूत जोरदार ठिय्या आंदोलनाद्वारे तीव्र निषेध
आंतरवाली लाठीहल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध : सेलूत सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार ठिय्या आंदोलन
सेलू जि.परभणी : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा सेलू (जि.परभणी) येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी, चार सप्टेंबररोजी जोरदार ठिय्या आंदोलन व राज्य सरकारला बांगड्यांचा आहेर पाठवून तीव्र निषेध करण्यात आला.
प्रशासकीय कार्यालय परिसरात भजन करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी महिला आंदोलकांनी तहसीलदार दिनेश झांपले यांच्या मार्फत सरकारला बांगड्यांचा आहेर पाठविला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. तहसीलदार दिनेश झांपले यांनी निवेदन स्वीकारले. मराठा आरक्षणासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर आंतरवाली सराटी येथे पोलिसांकडून अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. यात अनेक महिला, पुरुष, वयोवृद्ध नागरीक जखमी झाले आहेत. ही बाब संवेदनशील प्रशासनासाठी अत्यंत लाजीरवाणी आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा. आंतरवाली आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे विनाशर्त मागे घ्यावेत. शासन व प्रशासनातील दोषी व्यक्तीवर तात्काळ कार्यवाही करावी, मराठा समाजास न्याय द्यावा आदी मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा; राज्यभर जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. छगन शेरे, बजरंग आरकुले, शशांक टाके, रामेश्वर शेरे, सचिन रोडगे, मिनाक्षी गायकवाड, वैष्णवी पवार, वनिता बोबडे, रुक्मिणी चव्हाण आदींसह सकल मराठा समाज बांधवांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
आंतरवाली आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे विनाशर्त मागे घ्यावेत. शासन व प्रशासनातील दोषी व्यक्तीवर तात्काळ कार्यवाही करावी, मराठा समाजास न्याय द्यावा आदी मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा; राज्यभर जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सेलूत जय्यत तयारी