Carrom Competition : सेलूतील नूतन कन्या, विवेकानंद, प्रिन्स इंग्लिश स्कूल विजयी

Carrom Competition : सेलूतील नूतन कन्या, विवेकानंद, प्रिन्स इंग्लिश स्कूल विजयी

तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा : २१ संघातील १२६ खेळाडूंचा सहभाग

विविध प्रकारचे खेळ खेळल्याने आत्मविश्वास वाढतो. अपयशाला पचविण्याची ताकद खेळामधून निर्माण होते. यासाठी शालेय जीवनात एखाद्या तरी खेळाची आवड विद्यार्थ्यांनी जपणे आवश्यक आहे, असे मत श्रीगजानन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केले‌‌. सेलू तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कुलकर्णी बोलत होते.

Carrom Competition : सेलूतील नूतन कन्या, विवेकानंद, प्रिन्स इंग्लिश स्कूल विजयी

सेलू : येथील व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. क्रीडा व युवक सेवा संचालनाय पुणे, परभणी जिल्हा क्राडाधिकारी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय व नूतन महाविद्यालय, सेलू यांच्या संयुक्त सहकार्याने शुक्रवारी, चार सप्टेंबररोजी या स्पर्धा आयोजिण्यात आल्या होत्या. ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक सतीश नावाडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी श्रीगजानन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनीष बोरगांवकर, प्राचार्य हर्षद पांडव, पत्रकार श्रीपाद कुलकर्णी, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, खरात यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत तालुक्यातील १४,१७ व १९ वर्षे आतील मुले व मुलींच्या एकुण २१ संघातील १२६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. प्रास्ताविक गणेश माळवे यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय हुगे, तर गोविंद जाधव यांनी आभार मानले.
अंतिम फेरी सामन्यात १४ वर्षे मुलाच्या गटात : स्वामी विवेकानंद विद्यालय सेलू प्रथम, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल व्दितीय, १४ वर्षं मुली गटात : एलकेआरआर.प्रिन्स इंग्लिश स्कूल प्रथम, व्हिजन इंग्लिश स्कूल सेलू व्दितीय,१७ वर्षे मुले गटात एलकेआरआर प्रिन्स इंग्लिश स्कूल – प्रथम, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल , द्वितीय, १७ वर्षे मुली गटात: नूतन कन्या प्रशाला सेलू प्रथम, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल सेलू व्दितीय, १९ वर्षे मुले गटात एलकेआरआर प्रिन्स इंग्लिश स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. पंच म्हणून राजेश राठोड, अमर ठाकूर, सगीर फारोकी, अमर सुरवसे, गजानन साळवे, शुभम पवार यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर क्षीरसागर, अभिजित पडघन, तेजस घोडके, अच्युत खुपसे, शुभम काळे, तसेच क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Carrom Competition : सेलूतील नूतन कन्या, विवेकानंद, प्रिन्स इंग्लिश स्कूल विजयी


 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!