Saibaba Bank : सेलूतील साईबाबा बँक पद्मभूषण वसंतदादा पाटील पुरस्काराने सन्मानित
नाशिक येथील कार्यक्रमात अध्यक्ष हेमंतराव आडळकर व संचालक मंडळाने स्वीकारला पुरस्कार
पुरस्काराला उत्तर देतांना बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी सांगितले की, राज्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सहकार बळकट करण्यामध्ये ‘आपली बँक’ म्हणून ग्राहकांमध्ये साईबाबा नागरी बँकेची ओळख आहे. ती अधिक गतीमान करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत. हा पुरस्कार म्हणजे संचालक मंडळ, सभासद, ग्राहक, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सातत्यपूर्ण समर्पित प्रयत्नांचे सामुदायिक यश आहे. पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या नावाने असलेल्या पुरस्कार संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरणारा आहे.
सेलू, जि.परभणी : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुबंईची रौप्य महोत्सवी पद्मभूषण कै वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्काराने सेलू (जि.) परभणी येथील साईबाबा नागरी सहकारी बॅंकेला शनिवारी, नऊ सप्टेंबररेजी सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटी गुरूदक्षिणा सभागृहामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. सन २०२१-२०२२ या वर्षात शंभर ते अडीचशे कोटी रूपये ठेवी गटात छत्रपती सभाजी नगर (औरंगाबाद) विभागातून या विशेष पुरस्कारासाठी बॅंकेची निवड झाली. बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संचालक राजेंद्र आडळकर, दतरावं आंधळे, सुभाष चव्हाण, विधीज्ञ भगवानराव शिरसाठ, मुख्यकार्यकारी अधिकारी रामराव लाडाने, सुनील आडळकर, शेख जुनेद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.भारती पवार, नाशिकचे खासदार हेमंत पाटील ,एआरएनसीयुआयचे (दिल्ली) चीफ डॉ.सुधीर महाजन, महाराष्ट्र अर्बन कॉ ऑप बॅंक्स फेडरेशन मुबंईचे अध्यक्ष अजय ब्रमहेचा, सहकार भारती अध्यक्ष शशिताई अहिरे, एनसीयुआयचे सुभाष गुप्ता, सुमित मिश्रा आदी मान्यवराच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
साईबाबा नागरी बँकने गेल्या २७ वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे. सांस्कृतीक, शैक्षणिक, बँकेची सिबिएस विकासशील व्यस्थापनचा आदी वैशिष्ट्यांचा उल्लेख आहे.बॅंकेच्या सेलू, वालूर, परभणी, मानवत, जितूर बोरी या सहा शाखेतून काम करत आहे. सर्व शाखा सुसज व संगणिकृत आहेत. ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी वृद आहे. याव्दारे ग्रीहकांना सैदव तत्पर सेवा दिल्या जातात. या सर्व बाबींची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी सांगितले की, राज्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सहकार बळकट करण्यामध्ये ‘आपली बँक’ म्हणून ग्राहकांमध्ये साईबाबा नागरी बँकेची ओळख आहे. ती अधिक गतीमान करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. बॅंकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संचालक राजेंद्र आडळकर, दतरावं आंधळे, सुभाष चव्हाण, विधीज्ञ भगवानराव शिरसाठ, मुख्यकार्यकारी अधिकारी रामराव लाडाने, सुनील आडळकर, शेख जुनेद याची उपस्थिती होती.