यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हवेत : दिनेश झांपले; सेलूतील शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा उत्साहात

यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हवेत : दिनेश झांपले; सेलूतील शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा उत्साहात

नूतन कन्या, नूतन महाविद्यालय, न्यू मॉडर्न, पोदार, प्रिन्स इंग्लिश स्कूल विजयी

सेलू : जीवनात यश मिळवण्यासाठी भारतीय संघात खेळण्याचे मोठे ध्येय ठेवून त्याला जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण कठोर परिश्रमाची जोड द्यावी, असे आवाहन तहसीलदार दिनेश झांपले यांनी केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय परभणी, पं.स.गटशिक्षणाधिकारी कार्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी,‌ ९ सप्टेंबररोजी तालुका क्रीडा संकुल सेलू येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार दिनेश झांपले बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून कृषी अधिकारी भाऊसाहेब खरात, प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका संगीता खराबे, बॅडमिंटन तालुका सचिव जितेश घायतडक, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे यांची उपस्थिती होती. या वेळी भाऊसाहेब खरात यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच खेळाला सुद्धा खूप महत्त्वाचे स्थान आहे. खेळामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते. सांघिक भावना निर्माण होते. व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. नियमित अभ्यासाबरोबर खेळसुद्धा खेळायला पाहिजे. सेलू तालुक्यात खेळासाठी खूप पोषक वातावरण पहिल्या पासूनच आहे असे सांगितले.

या स्पर्धेत तालुक्यातील १४,१७ व १९ वर्षे आतील मुले व मुलींच्या एकुण २७ संघातील ११ प्रशालेचा सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे , सूत्रसंचालन जुलाह खुद्दूस तर किशोर नाईक यांनी आभार मानले. बक्षीस वितरण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते व अंकुश चित्रपटांचे दिग्दर्शक व लेखक निशांत धापसे, शाम चाफेकर, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष वनिता चापेकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा अंतिम निकाल : १४ वर्षे मुलाच्या गटात : प्रथम:-बोर्डीकर पोदार इंग्लिश स्कूल व्दितीय : ज्ञानतिर्थ विद्यालय सेलू,१४ वर्षं मुली गटात : प्रथम : न्यू मॉर्डन इंग्लिश स्कूल. व्दितीय : ज्ञानतिर्थ विद्यालय सेलू,१७ वर्षे मुलेच्या गटात : प्रथम : न्यू मॉर्डन इंग्लिश स्कूल व्दितीय : व्हिजन इंग्लिश स्कूल १७ वर्षे मुली गटात प्रथम : नूतन कन्या प्रशाला सेलू, व्दितीय : न्यू मॉर्डन इंग्लिश स्कूल सेलू. १९ वर्षे मुले : प्रथम : एल.के.आर.आर.प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू. १९ वर्षे मुली : नूतन महाविद्यालय सेलू, पंच म्हणून, राजेश राठोड, सुरज शिंदे, जगदीश लहाने, संगीर फारोकी, शुभम पवार, लतिफ चिचोंड, विशाल ढवळे, वेदांत बोचरे, बबलु घांडगे, ज्ञानदीप घांडगे, गोविंद झमरे यांनी काम पाहिले.


गुगळी धामणगाव ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!