सेवावृत्ती सेवानिवृत्त होत नसतात  : राजेंद्र लहाने; सतीश चौधरी यांचा सेवागौरव समारंभ उत्साहात

सेवावृत्ती सेवानिवृत्त होत नसतात  : राजेंद्र लहाने; सतीश चौधरी यांचा सेवागौरव समारंभ उत्साहात

सेलू : शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत असताना प्रामाणिकपणे सेवावृत्तीने काम करणारी व्यक्ती सेवानिवृत्त होत नसते असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने यांनी केले आहे. परभणी जिल्हा परिषद येथे शिक्षण विभागात कार्यरत असलेले सतीश चौधरी यांच्या सेवागौरव समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागातील वेतन अधीक्षक मनोज भातलवंडे, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेश बोराडे, व्हिजन इंग्लिश स्कूलचे संतोष कुलकर्णी, वालुरचे सरपंच संजय साडेगावकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश मुंडे, प्रा.महेश कुलकर्णी , सत्कारमूर्ती अनुराधा व गिरीश चौधरी,शुभांगी व सतीश चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. येथील श्री.केशवराज बाबासाहेब विद्यालयातील कै.वसंतराव खारकर सभागृहात रविवार, १० सप्टेंबररोजी आयोजित सेवागौरव समारंभप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की, वालुर येथील वै. ह.भ.प.बापूसाहेब महाराज चौधरी यांचा अध्यात्म क्षेत्रातील वारसा कायम ठेवत त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आजही आपल्या क्षेत्रात सेवावृत्तीने काम करत आहेत त्याचा आम्हांला अभिमान वाटतो सतीश चौधरी हे जिल्हा परिषद शिक्षण विभागात कार्यरत असताना त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले त्यामुळे सद्य परिस्थितीत शासकीय सेवेत त्यांच्या सारख्या व्यक्ती अपवादानेच दिसतात. ते शासकीय सेवेतुन आज निवृत्त होत असले तरी देखील कुटुंब व समाज यांच्याशी घट्ट जोडले गेले असल्या कारणाने यापुढे देखील ते सतत कार्यरत राहतील आणि समाजासाठी कायम सेवावृत्तीनेच काम करत राहतील असा आत्मविश्वास यावेळी बोलताना राजेंद्र लहाने यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी युवती कांग्रेसच्या प्रेक्षाताई भांबळे ,माजी सभापती अशोक काकडे ,शिक्षण विभागातील मनोज भातलवंडे ,गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत ,प्राचार्य शरद कुलकर्णी ,शरयू चौधरी ,धनंजय ताडलिंबेकर ,आदींनी मनोगत व्यक्त करून सतीश चौधरी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.सत्कारमूर्ती सतीश चौधरी यांनी सत्काराला उत्तर दिले. मीरा धामणगावकर, गायत्री गोस्वामी व बेबीताई देऊळगावकर यांनी कवितेचे वाचन केले. डॉ.गोपाळ चौधरी यांनी लिहिलेल्या प्रशस्तीपत्राचे वाचन विजय चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चौधरी ,सूत्रसंचालन डॉ.गोपाळ चौधरी यांनी केले, तर गिरीश चौधरी यांनी आभार मानले.


सेलूतील ब्रह्माकुमारी सेंटर परिसरात वृक्षारोपण

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!