‘नाकापेक्षा मोती जड’ नाटकाला पारितोषिक; सेलूच्या महिला कलाकारांचा सहभाग
सेलू जि.परभणी : कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नांदेड येथे आयोजित गटस्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये सेलू कामगार कल्याण मंडळाच्या ‘नाकापेक्षा मोती जड’या नाटिकेला द्वितीय क्रमाकांचे पारितोषिक प्राप्त झाले. नाटकाच्या दिग्दर्शनासाठी जयश्री सोन्नेकर-आडे यांना प्रथम, तर अभिनयाचे द्वितीय पारितोषिक मिळाले. मोहिनी लोणीकर, अनु पिंपळगावकर , आश्विनी पाटील, भाग्यश्री सोन्नेकर, कुलकर्णी, ज्योती सूर्यवंशी, आदिती, समिक्षा सोळंके, मानसी आणि जयश्री सोन्नेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नांदेड येथे ललित कला भवन येथे ह्या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत एकूण १२ नाटकांचा सहभाग होता. यशाबद्दल श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण संस्था आणि नाट्यप्रेमी कलाकारांचे अभिनंदन केले आहे.