LIC : सेलूतील एलआयसी कार्यालयामध्ये हिंदी पंधरवड्याला सुरुवात; विविध कार्यक्रमांचे आयोजन
सेलू : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू कार्यालयामध्ये १४ सप्टेंबरपासून हिंदी पखवाडे” चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदी दिवसानिमित्त भारतीय आयुर्विमा महामंडळ गृहमंत्री,अध्यक्ष यांनी विशेष संदेश दिला आहे. त्याचे वाचन योगेश जायभाये व नागेश पुराणिक यांनी केले. हिंदी पखवाड़ा दिनांक १४ ते २८सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. यामध्ये राजभाषाच्या संबंधित विविध प्रतियोगिता तथा अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त कर्मचारी, विकास अधिकारी, अधिकारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राजभाषा हिंदी मध्ये कार्य करण्यासाठी सांगितले. हिंदी पखवाडेचे उद्घाटन शाखा व्यवस्थापक संतोष कोडगीरकर यांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. या वेळी अविनाश जोशी, योगेश जायभाये, नागेश पुराणिक, शमशोदीन शेख,अजय पुंडलिक, शिवाजी अघाव, शुभम जोशी, भालचंद्र बरडे, भारत कोलते, श्रीपती जगताप, कृष्णा बोराडे, अमर पाटील, मन्मथ देवडे, राजकुमार नाईकवाडे, शंकर जिवणे, अरुण साळवे, अनिल शेळके, अमिर शेख, नितीन भिसे, संदीप जाधव, सरकटे आदी उपस्थित होते.