Engineer’s Day : साईबाबा बँकेतर्फे सेलूतील अभियंत्यांचा सन्मान
सेलू : येथील साईबाबा नागरी सहकारी बँकच्या वतीने शुक्रवारी, १५ सप्टेंबररोजी सर एम.विश्वेश्वरय्या जयंती व अभियंता दिनानिमित्त सेलू शहरातील अभियंत्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, डी.व्ही मुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी इंजिनिअर रशीदखान पठाण, भास्कर कोलते, सतीश बलदवा, हाजी अन्सारी, बालाजी उदावंत, भागवत कुमावत, सुशील नावाडे, सचिन वैद्य, प्रशांत सोन्नेकर, शेख अर्षद, प्रमोद कुलकर्णी आदींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व्यवस्थापक संतोष हुंगे यांनी केले. गजानन आडळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अविनाश आडळकर, शेख अबूजर, प्रीतेश जोशी, गजानन झुटे, श्रीहरी उदावंत, सुनील अडळकर, संतोष जायभाय, उमेश खरावणे यांनी परिश्रम घेतले.