सेलूतील अपूर्वा पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात

सेलूतील अपूर्वा पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात

नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित अपूर्वा पॉलिटेक्निकमध्ये सर मोक्षगुन्डम विश्वेश्वरय्या यांची जयंती व अभियंता दिन शुक्रवारी , १५ सप्टेंबररोजी उत्साहात साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष्य डॉ.संजय रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, अशोक बोडखे, अक्षय बन डॉ.मीनाक्षी रत्नपारखी आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलतांना डॉ.संजय रोडगे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नेहमी स्वतःला अद्यावत ठेवणे गरजेचे आहे.आज जे ज्ञान तुम्ही घेत आहात, त्या ज्ञानामध्ये तुम्हाला सतत भर घालावी लागेल, तरच स्पर्धेच्या युगात टिकू शकताल. पुस्तकी ज्ञानाचा उपयोग जो कृती मधून दाखवतो तोच खरा अभियंता. याप्रसंगी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत डॉ.संजय रोडगे यांनी केले.

अभियंता दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक प्राध्यापक अशोक बोडखे यांनी केले. सूत्रसंचालन पुष्पांजली या विद्यार्थिनीने केले, तर आभार प्राध्यापक विष्णू तेथे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अपूर्वा पॉलिटेक्निकमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!