Helical Stepwell : रेल्वे अधिकारी नीती सरकार यांनी केली वालूरच्या बारवाची पाहणी 

Helical Stepwell : रेल्वे अधिकारी नीती सरकार यांनी केली वालूरच्या बारवाची पाहणी 

 

सेलू : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकास कामांमध्ये सेलू रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. या रेखांकनामध्ये वालुरच्या जगप्रसिद्ध हेलिकल स्टेपवेलचाही समावेश केंद्र शासनाने केला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी, १७ सप्टेंबररोजी दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी बारावाची पाहणी केली. या वेळी सरपंच संजय साडेगावकर, उपसरपंच गणेशराव मुंढे, सुरेंद्र तोष्णीवाल, ग्रामपंचायत सदस्य सय्यद जलाल सय्यद आमिन, चंद्रकांत चौधरी, रामराव बोडखे, सुरेश भोकरे, बाजीराव बोडखे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यानिमित्ताने नीती सरकार यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी प्रामुख्याने अजंता एक्सप्रेस, नगरसोल नरसापुर या जलदगतीच्या रेल्वे गाड्यांचा सेलू स्थानकावरील थांबा नियमित करावा, अशी मागणी करण्यात आली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!