‘ज्ञानतीर्थ’च्या तीन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
सेलू : परभणी येथे क्रीडा व युवक संचालनालयाने महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित ज्ञानतीर्थ विद्यालय शाळेतील तीन विद्यार्थ्याची निवड विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातून श्रीकांत गजानन बरसाले याने प्रथम क्रमांक मिळविला, जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातून मयुरी अनिलराव तौर हीने द्वितीय क्रमांक मिळविला; तसेच योगासन स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातून आदर्श कुंडलिक बागल याने तृतीय क्रमांक मिळविला. तीनही विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी मिळविली. त्याबद्दल त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली. या स्पर्धेकरिता क्रीडा शिक्षक दीपक जोर्गेवर यांचे मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, मुख्याध्यापिका शालिनी शेळके, करणसिंग चव्हाण आदींनी मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार केला.